जत तालुक्यात कोरोना बाधीत रूग्ण आढळलेल्या ठिकाणी कंटेनमेंट आराखड्याची अंमलबजावणी

0


सांगली : जत तालुक्यात बिळूर, अचकनहळ्ळी (मेंढेगिरी वस्ती परिसर), उमदी (लोहार प्लॉट परिसर), संख (तलाठी चावडी परिसर), पांडोझरी (भिवर्गी फाटा परिसर), लमाणतांडा (द ब) (वरचा तांडा परिसर), गुलगुंजनाळ (कोळी वस्ती परिसर), निगडी खु. (बारूदवाले वस्ती परिसर) येथे कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्याने प्रशासनाने अत्यंत गतीमान हालचाली करत सदर रुग्ण ज्या परिसरातील आहेत तो परिसर कंटेनमेंट झोन केला आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून कंटेनमेंट झोनच्या परिघाबाहेरील काही परिसर बफर झोन केला आहे. अशी माहिती जत उपविभागीय अधिकारी प्रशांत आवटे यांनी दिली.
कंटेनमेंट झोन निगडी खुर्द (बारूदवाले वस्ती परिसर) –  निगडी खुर्द गावाच्या बारूदवाले वस्ती परिसराच्या उत्तरेकडे विठ्ठल यशवंत चव्हाण यांच्या जमीनीपर्यंत, पूर्वेकडे बाबासाहेब दस्तगीर बारूदवाले यांच्या जमीनीपर्यंत, दक्षिणेकडे विकास हरीभाऊ शिंदे यांच्या जमीनीपर्यंत, पश्चिमेकडे नारायण ईश्वर शिंदे यांच्या जमीनीपर्यंत. या स्थलसीमामध्ये अंतर्भूत क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून अधिसूचित केले आहे.

कंटेनमेंट झोन गुलगुंजनाळ (कोळी वस्ती परिसर) – गुलगुंजनाळ गावाच्या कोळी वस्ती परिसराच्या उत्तरेकडे भाग्यवंत लिंबाजी माने यांच्या जमीनीपर्यंत, पूर्वेकडे निंगाप्पा कोळी यांच्या जमीनीपर्यंत, दक्षिणेकडे कोळी वस्ती ते म्हेत्रे वस्ती रस्त्यालगत परशुराम लिंबाजी माने यांच्या जमीनीपर्यंत, पश्चिमेकडे इराप्पा लक्ष्मण कोळी यांच्या जमीनीपर्यंत. या स्थलसीमामध्ये अंतर्भूत क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून अधिसूचित केले आहे.

कंटेनमेंट झोन लमाणतांडा (द ब) (वरचा तांडा परिसर) – लमाणतांडा (द ब) येथील वरचा तांडा परिसराच्या उत्तरेकडे दरीबडची हद्दीतील घोलू लक्ष्मण लमाण यांच्या जमीनीपर्यंत, पूर्वेकडे नंदू टिपू लमाण यांच्या जमीनीपर्यंत, दक्षिणेकडे दरीबडची ते वरचा तांडा गाडीवाट रस्त्यालगत सोबू गोपू लमाण यांच्या घरापर्यंत, पश्चिमेकडे ईश्वर विठोबा राठोड यांच्या घरापर्यंत. या स्थलसीमामध्ये अंतर्भूत क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून अधिसूचित केले आहे.
कंटेनमेंट झोन पांडोझरी (भिवर्गी फाटा परिसर) – पांडोझरी गावाच्या भिवर्गी फाटा परिसराच्या उत्तरेकडे सोनाबाई कोहळ्ळी यांच्या जमीनीपर्यंत, पूर्वेकडे महादेव लोहार यांच्या जमीनीपर्यंत, दक्षिणेकडे वझिर मौलासो शेख यांच्या जमीनीपर्यंत, पश्चिमेकडे सरकारी फॉरेस्टपर्यंत. या स्थलसीमामध्ये अंतर्भूत क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून अधिसूचित केले आहे.

कंटेनमेंट झोन संख (तलाठी चावडी परिसर) – संख गावाच्या गावठाणच्या तलाठी चावडी परिसराच्या उत्तरेकडे तलाठी कार्यालयापर्यंत, पूर्वेकउे मानतेस बसाप्पा खंदाळे यांच्या प्लॉटपर्यंत, दक्षिणेकडे संख विजापूर रस्त्यालगत जुले गुरूबसू मठापर्यंत, पश्चिमेकडे राजेंद्र सिदगोंडा पाटील यांच्या घरापर्यंत. या स्थलसीमामध्ये अंतर्भूत क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून अधिसूचित केले आहे.

कंटेनमेंट झोन उमदी (लोहार प्लॉट परिसर) – उमदी गावाच्या गावठाणातील लोहार प्लॉट परिसराच्या उत्तरेकडे संजय पवार यांच्या घरापर्यंत, पूर्वेकडे संतोष अरेकरी यांच्या घरापर्यंत, दक्षिणेकडे मल्लिकार्जून साबणी यांच्या घरापर्यंत, पश्चिमेकडे विजापूर पंढरपूर रोडलगत जि.प. प्रा. मराठी शाळा उमदी नं. 1 पर्यंत. या स्थलसीमामध्ये अंतर्भूत क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून अधिसूचित केले आहे.

कंटेनमेंट झोन अचकनहळ्ळी (मेंढेगिरी वस्ती परिसर) – अचकनहळ्ळी गावाच्या मेंढीगिरी वस्ती परिसराच्या उत्तरेकडे बाबासो आप्पाण्णा कुंभार यांच्या जमीनीपर्यंत, पूर्वेकडे आबासो तुकाराम मोहिते यांच्या जमीनीपर्यंत, दक्षिणेकडे रामचंद्र केंचाप्पा परीट यांच्या जमीनीपर्यंत, पश्चिमेकडे प्रकाश कृष्णा कोळे यांच्या जमीनीपर्यंत. या स्थलसीमामध्ये अंतर्भूत क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून अधिसूचित केले आहे.

Rate Card

कंटेनमेंट झोन बिळूर (गावाच्या हद्दीत) – बिळूर गावाच्या परिसराच्या उत्तरेकडे जत बिळूर रस्त्यालगत यशवंत नानासो चव्हाण यांच्या जमीनीपर्यंत, पूर्वेकडे बिळूर खोजनवाडी रस्त्यालगत गोपाळ संगाप्पा बसर्गी यांच्या जमीनीपर्यंत, दक्षिणेकडे जत अथणी रोडलगत गुरूबसू बसाप्पा सवदी यांच्या जमीनीपर्यंत, पश्चिमेकडे धुळा बापू केसरकर यांच्या जमीनीपर्यंत. या स्थलसीमामध्ये अंतर्भूत क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून अधिसूचित केले आहे.

बफर झोन निगडी खुर्द (बारूदवाले वस्ती परिसर)- निगडी खुर्द गावाच्या बारूदवाले वस्ती परिसराच्या उत्तरेकडे मोहन विठ्ठल शिंदे यांच्या जमीनीपर्यंत, पूर्वेकडे बनाळी रस्यालगत विठ्ठल यशवंत चव्हाण यांच्या जमीनीपर्यंत, दक्षिणेकडे संजय बाळासो कोळी यांच्या जमीनीपर्यंत, पश्चिमेकडे नारायण ईश्वर शिंदे यांच्या जमीनीपर्यंत.

बफर झोन गुलगुंजनाळ (कोळी वस्ती परिसर) – गुलगुंजनाळ गावाच्या कोळी वस्ती परिसराच्या उत्तरेकडे परशुराम लिंबाजी माने यांच्या जमीनीपर्यंत, पूर्वेकडे विलास कामा माने यांच्या जमीनीपर्यंत, दक्षिणेकडे को बोबलाद हद्दीतील सर्जेराव मल्हारी जगताप यांच्या जमीनीपर्यंत, पश्चिमेकडे सुमन सुर्यकांत तलवार यांच्या जमीनीपर्यंत.

बफर झोन लमाणतांडा (द ब) (वरचा तांडा परिसर) – लमाणतांडा (द ब) येथील वरचा तांडा परिसराच्या उत्तरेकडे दरीबडची हद्दीतील नामदेव शहाजी भोसले यांच्या जमीनीपर्यंत, पूर्वेकडे मानसिंग गंगाराम राठोड यांच्या जमीनीपर्यंत, दक्षिणेकडे पांढरेवाडी फाटा ते आसंगी जत रस्त्यालगत हामुलाल आश्रम शाळेपर्यंत, पश्चिमेकडे हणमंत रामू कमते यांच्या जमीनीपर्यंत.

बफर झोन पांडोझरी (भिवर्गी फाटा परिसर) – पांडोझरी गावाच्या भिवर्गी फाटा परिसराच्या उत्तरेकडे उमेश व्हनखंडे यांच्या जमीनीपर्यंत, पूर्वेकडे पंढरपूर विजापूर रस्त्यालगत बंडू सावळा करे यांच्या जमीनीपर्यंत, दक्षिणेकडे धर्म शिवलिंग गोसावी यांच्या जमीनीपर्यंत, पश्चिमेकडे सरकारी फॉरेस्टपर्यंत.


बफर झोन संख (तलाठी चावडी परिसर) – संख गावाच्या गावठाणच्या तलाठी चावडी परिसराच्या उत्तरेकडे जत अंकलगी रस्त्यालगत अंकलगी ओढापात्रापर्यंत, पूर्वेकडे संख मध्यम प्रकल्पापर्यंत, दक्षिणेकडे धोंडाप्पा बनाप्पा टोणे यांच्या जमीनीपर्यंत, पश्चिमेकडे श्रीशैल येळदरी यांच्या जमीनीपर्यंत.

बफर झोन उमदी (लोहार प्लॉट परिसर) – उमदी गावाच्या गावठाणातील लोहार प्लॉट परिसराच्या उत्तरेकडे विजापूर पंढरपूर रस्त्यालगत मलाप्पा माळी यांच्या जमीनीपर्यंत, पूर्वेकडे उमदी सोनलगी रस्त्यालगत मुत्याप्पा सिध्दाप्पा मुरगोंड यांच्या जमीनीपर्यंत, दक्षिणेकडे विजापूर पंढरपूर रस्त्यालगत हणमंत शिवाजी कोकळे यांच्या जमीनीपर्यंत, पश्चिमेकडे जत चडचण रोडलगत विष्णू नामदेव नागणे यांच्या जमीनीपर्यंत.


बफर झोन अचकनहळ्ळी (मेंढेगिरी वस्ती परिसर) – अचकनहळ्ळी गावाच्या मेंढीगिरी वस्ती परिसराच्या उत्तरेकडे जत मंगळवेढा रस्त्यालगत पांुडुरंग विठ्ठल शिंदे यांच्या जमीनीपर्यंत, पूर्वेकडे भैराप्पा मलकाप्पा तेग्गीमाळी यांच्या जमीनीपर्यंत, दक्षिणेकडे शिवानंद गुंडू परीट यांच्या जमीनीपर्यंत, पश्चिमेकडे राजाराम बाळासाहेब शिंदे यांच्या जमीनीपर्यंत.

बफर झोन बिळूर (गावाच्या हद्दीत) – बिळूर गावाच्या परिसराच्या उत्तरेकडे येळदरी गावाच्या उत्तरेस अमोगसिदध तुकाराम सरगर यांच्या जमीनीपर्यंत, पूर्वेकडे खोजनवाडी गावातील जत उमराणी रस्त्यालगत नेमीनाथ भाऊ बडबडे यांच्या जमीनीपर्यंत, दक्षिणेकडे बसर्गी गावठाणच्या दक्षिणेस निंगाप्पा तुकाराम कांबळे यांच्या घरापर्यंत, पश्चिमेकडे खिलारवाडी गावाच्या पश्चिमेस श्रीशैल मलाप्पा कोटगोंड यांच्या जमीनीपर्यंत, आग्नेयकडे उमराणी गावाच्या आग्नेयस सविता राजू सनदी यांच्या घरापर्यंत, नैऋत्येकडे वज्रवाड गावाच्या नैऋत्येस पराप्पा बाळू कुल्लोळी यांच्या घरापर्यंत, वायव्येकडे साळमळगेवाडी गावाव्या वायव्येस रफिक बाळू शेख यांच्या घरापर्यंत, ईशान्यकडे मेंढेगिरी गावाच्या पश्चिमेस शिवाजी गणपती सरगर यांच्या जमीनीपर्यंत.

सदर भागांमध्ये सर्व प्रतिबंधात्मक आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आदेश जत उपविभागीय अधिकारी प्रशांत आवटे यांनी दिले आहेत.


Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.