सिद्धेवाडी तलाव सलग दुसऱ्या वर्षी भरला | परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चैतन्य : हजारो हेक्टर शेतीला होणार फायदा

0

तासगाव : तालुक्यातील सर्वात मोठा मध्यम प्रकल्प असणारा सिद्धेवाडी येथील तलाव सलग दुसऱ्या वर्षी भरला आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चैत्यन्याचे वातावरण आहे. या तलावातील पाण्याचा हजारो हेक्टर शेतीला फायदा होणार आहे.

      तासगाव पूर्व भागातील दुष्काळी भागाला वरदान ठरणारा म्हणून सिद्धेवाडी तलावाची ओळख आहे. या तलावाची पाणी साठवण क्षमता 302.95 द. ल. घ. फु. इतकी आहे. वायफळे, बिरणवाडी, सावळज, सिद्धेवाडी या भागातील हजारो हेक्टर शेतीला या तलावातील पाण्याचा उपयोग होतो. या तलावातून अनेक गावांना प्रादेशिक पिण्याच्या पाण्याच्या योजनाही सुरू आहेत.

टोणेवाडीत तीन सिमेंट बंधारे गायब | वसुलीचे निश्चित केलेले रक्कम वसूलीस केराची टोपली |

     मात्र, गेल्या अनेक वर्षांच्या दुष्काळामुळे हा तलाव सातत्याने कोरडा, ठणठणीत पडत होता. गतवर्षी सोडले तर गेल्या अनेक वर्षात हा तलाव कधीच भरला नव्हता. त्यामुळे तलावाकाठच्या गावांची अवस्था ‘तलाव उशाला आणि कोरड घशाला’ अशी झाली होती. तलावात पाणी नसल्याने शेती धोक्यात आली. प्रादेशिक पाणी योजना अखेरच्या घटका मोजत होत्या.

Rate Card

     मात्र, गेल्या दोन वर्षात तासगाव तालुक्यात तुफान पाऊस कोसळत आहे. त्यातच गेल्या वर्षापासून टेंभुच्या पाचव्या टप्प्यातून सिद्धेवाडी तलावात पाणी सोडण्यात येत आहे. गतवर्षी ‘न भूतो, न भविष्यती’ असा पाऊस कोसळल्याने अवघ्या आठवडाभरात हा तलाव ओव्हरफुल झाला होता. यावर्षीही अंदाजापेक्षा लवकर पाऊस सुरू झाल्याने सलग दुसऱ्या वर्षी तलाव भरला आहे.

   

 तलाव भरल्याने परिसरातील शेतकरी सुखावले आहेत. राज्यकर्त्यांना या भागाचा दुष्काळ संपवता आला नाही, मात्र निसर्गानेच वायफळे, सावळज परिसराचा दुष्काळ संपवला, अशी भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.