सुनीता पवार यांंच्याकडून मास्क,थर्मल मीटर,हँडग्लोजचे वाटप

जत,प्रतिनिधी : तालुक्यातील बनाळी जिल्हा परिषद गटात महिला व बालकल्याण सभापती सुनीता पवार यांनी येळवी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र येथील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी,आशा वर्कर्स यांच्या भेटी घेतली.भेटी दरम्यान त्यांनी मास्क,थर्मल मीटर, हॅन्ड ग्लोजचे वाटप केले.येळवी, बनाळी, आवंढीसह सर्व उपकेंद्र व आशा वर्कर्स यांना दहा हजार मास्क व अन्य साहित्याचे वाटप केले. सभापती सुनीता पवार यांनी येळवी प्राथमिक आरोग्य केंद्र,उपकेंद्र यांना भेटी दिल्या.
रस्त्याच्या साईटपट्ट्या बनल्या नाले | तालुक्यातील रस्ते कामात मोठे गफले : गटारी गायब |
यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष सुनीलपवार, येळवी सरपंच विजयकुमार पोरे, संचालक शंकर आवटे,रोहन कन्स्ट्रक्शनचे राजकुमार धोत्रे, भाऊसो कदम, वैद्यकीय अधिकारी डॉ. भारती पाटील, डॉ.दत्तात्रय खडतरे, डॉ.तुषार कणसे,आरोग्य सहाय्यक पांडुरंग खुले,
शिवानंद परीट, प्रकाश कोळी, मंगल फडणीस, आरोग्य सेविका अनिता यादव, सुरेखा विभूते, मंदाकिनी कोळेकर, आशा स्वयंसेविका मंगल पोतदार, वैशाली पोरे, चंद्रकला सुतार, नंदा साळुखे आदी उपस्थित होते. सरपंच विजयकुमार पोरे यांनी सभापती सुनीता पाटील यांनी आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानले.
येळवी येथे सुनीता पवार यांंच्याकडून
मास्क,थर्मल मीटर,हँडग्लोजचे वाटप करण्यात आले.