रोहित पाटील कॅमेराजीवी, कामं करायचं त्यांना माहित नाही | संजय पाटील यांचा घणाघात : त्यांना मी आव्हान मानत नाही

0
159

  
तासगाव : रोहित पाटील हे कॅमेराजीवी आहेत. केवळ टीआरपी मिळवण्यासाठी त्यांची धडपड सुरू असते. मतदारसंघात कामं करायचं त्यांना माहित नाही. विधानसभा निवडणुकीत मी त्यांना आव्हान मानतच नाही, असा घणाघात तासगाव - कवठेमहांकाळचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार, माजी खासदार संजय पाटील यांनी केला.

   महायुतीच्या जागा वाटपात तासगाव कवठेमहांकाळ विधानसभेची जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला गेली. त्यामुळे भाजपचे माजी खासदार संजय पाटील यांनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादीमध्ये आज प्रवेश केला. त्यांना अजित पवार गटाने तासगाव कवठेमहांकाळची उमेदवारी दिली आहे. यानंतर मुंबई येथे पत्रकारांची बोलताना पाटील यांनी रोहित पाटील यांचा खरपूस समाचार घेतला.

   ते म्हणाले, रोहित पाटील हे कॅमेराजवी नेते आहेत. टीआरपी मिळवण्यासाठी त्यांची नेहमीच धडपड सुरू असते. आम्ही केलेल्या कामाचे श्रेय ते वारंवार घेत आहेत. त्यांना मतदारसंघात काम करायचं माहीत नाही. येत्या विधानसभा निवडणुकीत मी त्यांना माझ्या समोरील आव्हान मानतच नाही.

   दरम्यान, लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर संजय पाटील गट नैराशेत गेला होता. मात्र आता पुन्हा नैराश्य झटकून हा गट जोमाने कामाला लागला आहे. स्वतः संजय पाटील यांना तासगाव कवठेमहांकाळ विधानसभेची उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे या गटाचे कार्यकर्ते रिचार्ज झाले आहेत. लोकसभेच्या पराभवानंतर आलेली मरगळ झटकून ते पुन्हा कामाला लागले आहेत.

     रोहित पाटील व संजय पाटील यांच्यातील ही निवडणूक अतिशय चुरशीची होण्याचे संकेत आहेत. दोघांमधील लढतीमुळे पुन्हा तासगाव - कवठेमहांकाळमध्ये दोन्ही कुटुंबांमधील टोकाचा संघर्ष पाहायला मिळणार आहे. या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. 'हायव्होल्टेज' अशीच ही लढत असणार आहे.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here