जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात अंकलेतून सुरू झालेला कोरोनाचा प्रवास बिळूरमध्ये हॉटस्पॉट करण्यापर्यत प्रभावशाली ठरला आतापर्यत तालुक्यात 97 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले होते.मात्र दक्ष आरोग्य यंत्रणाच्या गांऊड उपाययोजना मुळे तालुक्यात कोरोनाचा प्रभाव ओसरताना दिसतोय.
तालुक्यातील अंकले,जत,खलाटी,
आंवढी,बिळूर,गलगुंजनाळ,उमदी,लमाणतांडा,संख,निगडी खुर्द या गावात कोरोनाचे रुग्ण आढळून आले होते.
गिरगांवच्या महिला सरपंचास मारहाण | चार जणाविरूध गुन्हा दाखल |
यातील बिळूरमधील प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढला होता.एकाच गावात 69 रुग्ण बाधित झाल्याने भितीचे वातावरण पसरले होते.मात्र तालुका प्रशासन,आरोग्य विभाग,ग्रामपंचायतीच्या सतर्कता कोरोनाचा प्रभाव कमी करण्यात यशस्वी ठरला आहे.पहिला रुग्ण सापडताच आरोग्य यंत्रणा कमालीची सतर्क झाली होती. एका इस्ञी दुकानदारा पासून सुरू झालेला कोरोनाचा प्रसार रुग्ण आढळून येताच त्यांच्या संपर्कातील सुमारे 1185 लोकांना संस्था, होम क्वोरोंटाईन करत प्रभाव रोकण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते.त्याला मोठे यश आले आहे.बिळूरचा प्रभाव कमी झालाच त्याचबरोबर तालुक्यातील अन्य गावातील कोरोना प्रभाव जवळपास संपविण्यात प्रशासनाला यश आले आहे.हॉटस्पॉट बिळूरमधील पहिल्या टप्यातील सुमारे 19 जण कोरोना मुक्त होऊन घरी परतले आहेत.पुर्व भागातील उमदी,गुलगुंजनाळ मधिलही संपर्काती बाधित संख्या कमी होत असल्याने तालुक्यातील कोरोना प्रभाव रोकण्यात तालुका प्रशासन यशस्वी झाले म्हटल्यास वावगे वाचणार नाही.
निगडी खुर्द हैंद्राबादहून आलेल्या तिघे कोरोना पॉझिटिव्ह |
जतची रुग्ण संख्या
बिळूर 69,अंकले 4,आंवढी 4,गुलगुंजनाळ 4,जत 2,निगडी 5,संख,वाळेखिंडी,खलाटी,मेंढिगि