नामदेव छीपा समाजच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी दिनकर पतंगे
जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि शिवसेना नेते दिनकर पतंगे यांची नामदेव छीपा समाज संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे, त्यांची निवड महाराष्ट्र राज्य प्रभारी खेमराज नामा (सोलंकी) यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. दिनकर पतंगे आतापर्यंत या guyसमाजासाठी आपले मोलाचे योगदान दिले असून त्यांनी अनेक योजना व उपक्रम राबविले आहेत.त्यांनी या समाजातील लोकांसाठी वधू/वर मेळावे,सामाजातील गरजूंना आर्थिक मदत,असे अनेक उपक्रम स्वखर्चाने घेतले आहेत.

माझ्यावर समाजातील वरिष्ठ नेत्यांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरवत राज्यभर विस्कटलेला समाज्याला एक छताखाली असून सामाजिक स्तर उंचविण्यासाठी प्रयत्न करू,समाजातील तळागाळातील लोकांसाठी काम करित राहीन असे दिनकर पतंगे यांनी सांगितले. या निवडीने पतंगे यांचे जत तालुक्यात सर्वत्र अभिनंदन होत आहे.