जतच्या सिध्दार्थ पब्लिक स्कूलचा (सी.बी.एस.ई मान्यताप्राप्त)10 वीचा 100 टक्के निकाल
जत,प्रतिनिधी : येथील श्री.उमाजीराव सनमडीकर मेडीकल फौडेशन जत, संचलित सिध्दार्थ पब्लिक स्कूल या सी.बी.एस.ई मान्यताप्राप्त शाळेचा सी.बी.एस.ई बोर्डाने दिनांक 15-07-2020 रोजी घोषित केलेल्या इयत्ता 10 वी निकालामध्ये 100 टक्के निकाल लागला.शाळेची प्रथमच बँच मध्ये एकूण 20 विद्यार्थी परीक्षेस बसले होते.त्यापैकी शुंभागी महादेव लोखंडे 96.4 टक्के प्रथम क्रमांक,सत्यजित कुंडलिक सलगर 94.6 टक्के द्वितीय क्रमांक, स्वाती महादेव निब्याळ 89.4 टक्के तृतीय क्रमांक यांनी उल्लेखनीय यश मिळविले.इतर सर्व विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश संपादन केले.
उत्तीर्ण झालेल्या मुलांचे संस्थेचे चेअरमन श्री.उमाजीराव सनमडीकर,डॉ.कैलास सनमडीकर,विश्वस्त डॉ.सौ.वैशाली सनमडीकर यांनी कौतुक केले.जत तालुक्यातील एकमेव सीबीएसई बोर्ड मान्यप्राप्त सिध्दार्थ पब्लिक स्कूलने पुन्हा एकदा आपली यशाची घौडदोड कायम ठेवली आहे.स्कूलची दहावी पहिल्याच बँचच्या विद्यार्थ्यांनी जिल्ह्यात नावलौकिक मिळविला आहे.यशस्वी झालेल्या मुलांना शाळेचे प्राचार्य डॉ.विल्सन थॉमस, मार्गदर्शक शिक्षिका सौ.सविता पाटील,शशिकांत भामरे सौ.रंजना कांबळे,मंजुश्री कोरे,विश्वास भोसले,सौ.वर्षा पाटील,काडसिध्द हिरगोंड,यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.यशस्वी विद्यार्थ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सिध्दार्थ स्कूलचे विद्यार्थी स्पर्धेच्या युगात नावलौकिक मिळवतील
आमच्या सिध्दार्थ पब्लिक स्कूल तयार होणारे विद्यार्थी बदलत्या जगात यशस्वी ठरतील,त्याशिवाय आपल्या गुणवत्ता, कतृत्वातून उज्वल यश संपादन करत स्कूलसह गाव,तालुक्याचा नावलौकिक मिळवितील.यशस्वी विद्यार्थी घडविण्यात आम्ही सर्वोत्तम योगदान देत आहोत.यापुढेही स्कूलचा प्रगतीचा आलेख कायम राहील.
डॉ.विल्सन थॉमस,प्राचार्य
