बिळूर आणखीन काही दिवस लॉकडाऊन | प्रांताधिकारी : अजूनही परिस्थिती गंभीर,नियम पाळा
जत,प्रतिनिधी : कोरोनाचे पार्श्वभूमीवर आज बुधवारी जतचे उपविभागीय अधिकारी प्रंशात आवटे,तहसिलदार सचिन पाटील यांनी कोरोना हाॅटस्पाॅट बिळूरला भेट देऊन आढावा घेतला.कोरोनाचा प्रभाव जरी कमी झाला असेल तरीही पुढील काही दिवस गावातील लाॅकडाऊन उठवू नये अशा सुचना यावेळी ग्रामपंचायतीला दिल्या. जत तालुक्यातील बिळूर मध्ये एका कोरोना बाधिताच्या संपर्कातून एकोनसत्तर कोरोना पाॅझीटीव्ह रूग्ण आढळून आल्याने प्रशासनाने बिळूर गाव हाॅटस्पाॅट जाहीर करून बिळूर गावात येणारे सर्व मार्ग बंद केले आहेत.
रस्त्याच्या साईटपट्ट्या बनल्या नाले | तालुक्यातील रस्ते कामात मोठे गफले : गटारी गायब |
बिळूर येथे कोरोनाचे रूग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याने प्रशासनाचे कोरोना पाॅझीटीव्ह रूग्णाचे संपर्कात असलेल्या हायरिस्क व अन्य लोकांना जत येथील कोविड सेंटर मध्ये संस्थात्मक काॅरंटाईन केले होते.पॉझिटिव्ह रुग्णामध्ये जवळपास संस्थात्मक काॅरंटाईनमधीलच व्यक्ती आढळून आल्या आहेत.गेल्या तीन दिवसात नव्याने बिळूर येथील कोणतीही व्यक्ती कोरोना पाॅझीटीव्ह आढळून आलेली नाही.त्यामुळे बिळूर मधील कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याचे निश्चित झाले आहे.
बिळूर येथील एका इस्त्री व्यवसाईकापासून बिळूर येथे कोरोनाचा शिरकाव होऊन नंतर तो वाढत जाऊन एकोनसत्तर पर्यंत पोहचला.यापैंकी प्रथम कोरोना पाॅझीटीव्ह आल्याल्या इस्त्री व्यवसाईकाचा मिरज येथिल एका मोठ्या खासगी हाॅस्पीटल मध्ये उपचारादरम्यान मृत्यु झाला होता.
गिरगांवच्या महिला सरपंचास मारहाण | चार जणाविरूध गुन्हा दाखल |
बिळूर येथे ग्रामपंचायतीच्या व जत नगरपरिषदेच्या अग्नीशामक गाडीच्या मदतीने संपूर्ण गाव निर्जंतुकीकरण करण्यात आले.कोरोनाचे पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी,जिल्हा आरोग्य अधिकारी भूपाल गिरिगोसावी, जतचे उपविभागीय अधिकारी श्री.आवटे,तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप जगदाळे, पोलीस निरीक्षक रामदास शेळके, जतचे तहसिलदार श्री.पाटील, तालुका आरोग्य अधिकारी संजय बंडगर, बिळूर येथील वैद्यकिय अधिकारी डाॅ. प्रमोद कांबळे यांनी मोठ्या प्रमाणात दक्षता संसर्ग आटोक्यात आणला आहे.बिळूरमध्ये कार्यरत असलेल्या आरोग्य पथकाचे हे मोठे यश आहे.
सद्यस्थितीत बिळूर येथील कोरोनाची परिस्थिती हळूहळू पूर्व पदावर येऊ लागली आहे. बिळूर येथील एकोनसत्तर कोरोना बाधित रूग्णापैकी जवळपास चाळीस रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

बिळूर येथील ग्रामस्थ व शेतकरी यांच्याकडून बिळूर गावात लागू केलेल्या लाॅकडाऊनमुळे गावातून बाहेर जाणारे रस्ते बंद असल्यामुळे आम्हाला आमच्या शेतात जाता येत नाही व शेतातील कामे करता येत नाहीत. त्यामुळे शेतात जाण्यासाठी तरी लाॅकडाऊन शिथिल करा व रस्ते मोकळे करा,अशी विनंती केली होती.त्या पार्श्वभूमीवर आवटे व पाटील यांनी बिळूरला भेट देत लोकांशी संवाद साधत भूमिका स्पष्ट केली.
प्रशांत आवटे म्हणाले की,प्रशासन तुमच्यासाठी आहे.कोरोनातून गाव मुक्त व्हावे,यासाठी आम्ही प्रयत्न करित आहोत.परिस्थिती अजूनही गंभीर आहे.कोरोनाचा अजून काही दिवस राहू शकतो.त्यामुळे लॉकडाऊन गरजेचे आहे.वीस दिवस सहन केले आहे.पुढील दहा दिवस काळजी घ्यावी.कुणीही लॉकडाऊन काळात नियम तोडण्याचा प्रयत्न करू नये,अन्यथा कारवाई करू असा इशाराही प्रांताधिकारी आवटे यांनी दिला आहे.
यावेळी बिळूरचे सरपंच नागनगौडा पाटील, राजेंद्र उर्फ बाबा पाटील, महांतेश गडीकर, माजी सरपंच लक्ष्मण मंगसुळी, आण्णाप्पा गडीकर व ग्रा. पं.सदस्य उपस्थित होते.