जत तालुका आदिलशाही मधील एक प्रांत होता. तालुक्यातील प्रगत व ऐतिहासिक वारसा लाभलेले गाव म्हणजे डफळापूर येथील चव्हाण (चौहान) यांनी डफळापूरला आजमार केले. गावाला इ.स.1200 पासूनची परंपरा आहे.स्वंतत्र संस्थानकालीन गाव आहे. पुर्वी गाव कापूर ओढ्या नजिक वसले होते. तेव्हाचा दवनापूर म्हणून उल्लेख आढळतो.मुळ लोक चव्हाण (चौहान ) होते. राजस्थानातून लढाया करत येऊन डफळापूर येथे वास्तव केले.त्यातिल काही लोक कुंडल,डिग्रज,कवलापूर सोनी भागात विकुरले आहेत.यल्लदेव या पुरूषापासून येथील जहागिरीची निर्मिती झाली.त्यांना माणकाबाई,वरमाबाई,या दोन राण्या होत्या.पैंकी माणबाईच्या पुत्राकडे मुलखी व पोलिस पाटीलकी आली.रमाबाईच्या मुलाकडे शासकीय कारभार सोपविण्यात आला.डफळापूर नजिक जतला जोडणाऱ्या मार्गावर असणाऱ्या पुलाचे उद्घाटन राणीबाई डफळे यांनी 1949 केल्याची कोनशिला आहे याचाचं अर्थ राणीबाई डफळे या येथील जहागिरीच्या शेवटच्या राणी असाव्यात. जत पासून 18 किलोमीटरवर असलले डफळापूरला प्रांचिन व ऐतिहासिक संदर्भ लाभले असून येथे वसलेले बुवानंद पिर दर्ग्यामुळे नावलौकिक मिळाला आहे. नवसाला पावणारा,आणि अति करणाराला शासन करणार पीर म्हणून बुंवानद ओळखला जातो. या पिराचा उरूस हिंदू-मुस्लिंम गुण्यागोंविदाने साजरा करतात.उरूसानिमित्त अनेक कार्यक्रमाची रेलचेल असते. श्री. बुवानंद पिरासही ऐतिहास इतिहासाचा संदर्भ आहे. बुवानंद मुळचे आध्रंप्रदेशातील सुफी संत होते.हैद्राबादहून मजल दरमजल करत मनुष्य धर्माचा प्रसार करत ते खलाटी येथे डोंगरावर आले.डोंगरावर त्याचे येणे-जाणे सुरू झाले.तेथेही ते धर्म रक्षणार्थ आपले कार्य अखंडित करत होते.त्यांच्या या जनरक्षक कामामुळे परिसरात त्यांच्या विषयी आधार निर्माण झाला. बुवानंद ज्या खलाटी डोंगरावर राहत तेथे लोंकाची ये-जा सुरू झाली.पंरतू उंचावरील डोंगर कपारीतून जाताना भाविकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते.गावकऱ्यांनी त्यांना विंनती करून डफळापूर गावात आणले तेथेच ते रहात होते. त्याला आता पाचशे वर्षाचा काळ लोटला.डफळापूरच्या राजांनी त्यांना राहण्यासाठी जागा दिली.त्यांची पुर्वी समाधी होती.त्यांचा घुमट कोसळल्यानंतर गावकऱ्यांनी मिळून बसस्थानकानजिक दर्गा बांधला,या दर्ग्याची विस गुठें जागाही आहे. प्रांरभी प्रवेश द्वार,आतमध्ये दर्ग्या व त्यात बुवानंदाची समाधी आहे. यात्रा काळात हाजारो भक्त दर्शन घेतात.
श्री. बुवानंदाला राजानी दिलेला घोडा व घोड्यासाठी राजवाड्या जागाही दिली आहे. सतत घोड्याची परपंरा होती. मात्र गेल्या दोन वर्षापुर्वी घोडा मयत झाल्याने ती परपंरा खंडीत झाली आहे.घोड्या घ्यावा असेही काही नागरिकांना वाटते. घोडा नसल्याने डफळापूरला पाऊस पानी कमी होत असल्याचेही नागरिक सांगतात.पुर्वी घोड्याच्या अंगावर गलेफ चढवून दर गुरूवारी राजवाड्या पासून मिरवणूकीने दर्ग्यापरत आणला जात होता. गलेफ चढवून पुन्हा घोडा राजवाड्यात पाठविला जायाचां. घोड्याची पालपोलनची जबाबदारी मुल्ला कुंटुबाकडे होती.बुवानंदाचे पुजारी होण्याचा मान खतीबाच्या कडे आहे. देवाचे इनामही तेच कसतात. अनेक गावात इनामी जमिऩी असल्याचा संदर्भ मिळतो . परिसरातील हाजारो भक्ताच्या श्रंध्देचे स्थान म्हणून बुवानंद दर्गा परिचित आहे. बोकड कापण्याची परपंरा आहे.ती वर्षभर सुरू असते.पुजाऱ्याचे कुंड पुजनाने पिराला नेवेध दाखवायची पंरपरा आहे.
उरूसासाठी कमिटीकडून सर्व तयारी पुर्ण झाली आहे.दर्ग्याला रंगरंगोटी केली आहे. नविन डागडूजीही केली आहे. परिसरातील स्वच्छता करून परिसर सुंदर केला आहे.गावातही धार्मिक वातावरण निर्माण झाले आहे. यात्रेनिमित्य भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.सलग तिन दिवस विविध कार्यक्रमांनी उरूस साजरा केला जाणार आहे.पक्ष,गट विरहित सर्व गट एकत्र येत गुण्यांगोविंदाने उरूस साजरा केला जात आहे