सांगली : सांगली जिल्ह्यात कोरोनाचे मंगळवारी आणखी दोन बळी गेले.मिरज शहरातील नदीवेस येथील 55 वर्षीय व्यक्ती व माजी सैनिक वसाहत येथील 55 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.जिल्ह्यात दिवसभरात तब्बल 40 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे.त्यात
जत तालुक्यातील गुलगुंजनाळ 3,उमदी 1अशा चार जणांची भर पडली आहे.कवठेमहांकाळ तालुका – रांजणी 1, सराटी 1 येथेही नव्याने कोरोना बाधित आढळून आले आहेत.
कुपवाडमधील खून प्रकरणाचा छडा | जत तालुक्यातील जिरग्याळ येथून घेतले पाच संशयितांना ताब्यात |
बाधितमध्ये सांगली महापालिका क्षेत्रातील 18 जण,सांगली शहर 12,मिरज शहर 6 जण वाढले आहेत. जिल्ह्यातील आजचे रुग्ण असे,आटपाडी तालुका- नेलकरंजी 1,मिरज तालुका – शिंदेवाडी 2 ,कवलापूर 2 ,बेळंकी 4, मालगाव 4, – शिराळा तालुका – चरण 1,सय्यदवाडी 1,शिराळा शहर 1,आज उपचार घेणारे 21 जण झाले कोरोना मुक्त झाले आहेत.सध्या अँक्टिव्ह कोरोना रुग्ण संख्या 321 वर पोहचली आहे.जिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णांची नोंद संख्या 681 झाली आहे.आज पर्यंत कोरोना बाधित मृत्यू संख्या 21 जणांंचा कोरोनामुळे मुत्यू झाला आहे.
दरम्यान जत तालुक्यातील गुलगुंजनाळ येथील बाधित रुग्णाच्या संपर्कातील तिघासह उमदीतील बाधित रुग्णापैंकी एक बालकास कोरोनाची बाधा झाली आहे.