मोबाइल दिला नाही,म्हणून शाळकरी विद्यार्थ्याची आत्महत्या

0

जत,प्रतिनिधी : मल्लाळ ता.जत येथील शाळकरी विद्यार्थ्यांने शाळेच्या ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाईल घेऊन दिला नाही.म्हणून गळपास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली.आदर्श आप्पासो हराळे(वय-15,रा.हराळेवस्ती)असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे.

पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी,लॉकडाऊनमुळे शाळा बंद आहेत.काही शाळांनी ऑनलाइन शिक्षणांची सोय केली आहे.आदर्श हा ऑनलाईन वर्गासाठी मोबाइल घ्या म्हणून घरात तगादा लावला होता.


Rate Cardकुपवाडमधील खून प्रकरणाचा छडा | जत तालुक्यातील जिरग्याळ येथून घेतले पाच संशयितांना ताब्यात |


आर्थिक परिस्थिती,पैशाची चणचण यामुळे,वडीलांनी मोबाईल घेतला नव्हता,मंगळवारीही आदर्शने दिवसभर मोबाइल घ्यावा म्हणून तगादा लावला होता.संध्याकाळी अखेर त्यांने मनास वाईट वाटून घेत राहत्या घरातील अँगलला दोरीला गळपास लावून आत्महत्या केल्याचे संध्याकाळी साडेआठ सुमारास समोर आले.याप्रकरणी जत पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.