बिळूरमधील आणखीन तिघे कोरोना पॉझिटिव्ह | एक महिला,मुलगी,एका पुरूषाचा समावेश | बिळूरची संख्या 69

0

जत,प्रतिनिधी : बिळूर ता.जत येथे शनिवारी पुन्हा तीन नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.

बिळूरची आतापर्यत एकूण संख्या 69 झाली आहे.

Rate Card

एका इस्ञी दुकानदारा पासून बिळूरमध्ये आलेला कोरोना संसर्ग 69 जणापर्यत पोहचला आहे.आरोग्य विभागा कडून कोरोनाचा प्रभाव रोकण्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरू आहे.त्यात आरोग्य यंत्रणांना यश येत आहे.बाधित रुग्णाच्या संपर्कातील 1185 लोकांना क्वोरोंटाइन करत आरोग्य यंत्रणाकडून कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न केला आहे.

शनिवारी क्वोरोंटाइन केलेल्या 38 वर्षाचा पुरूष,65 वर्षाची महिला,15 वर्षाची मुलगी अशा तिघाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.जत तालुक्यातील दरिबडची येथील 28 वर्षीय पुरूष,उमदी येथील 40 वर्षाचा पुरूष,जत येथील 32 वर्षाचा पुरूष असे तिघेजण नॉन-इन्व्हेजीव व्हेंन्टिलेटरवर ठेवण्यात आले आहेत.जत तालुक्यातील कोरोना बाधित रुग्ण 90 झाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.