आंवढीत जागेच्या वादातून तिघांना मारहाण

0
3


जत,प्रतिनिधी : आंवढी ता.जत येथे जागेच्या वादावरून एका महिलेसह तिंघाना नात्यातील चौघांकडून मारहाण करण्यात आल्याचा गुन्हा जत पोलीसात दाखल झाला आहे.

फिर्यादी युवराज साहेबराव काशिद,कुसुम सोपान काशिद,प्रकाश दिगंबर काशिद हे तिघे यात जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, फिर्यादीची आजी कुसूम काशिद यांना मंजूर झालेल्या घरकूलच्या जागेची पाहणी करण्यासाठी आलेल्या जत पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांसमोर भावकीतील अरविंद दत्तात्रय काशिद,दत्तात्रय दिगंबर काशिद,शालन दत्तात्रय काशिद,अश्विनी अरविंद काशिद या चौघांनी वाईट वगाळ शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण करत जखमी करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादी म्हटले आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here