जत कारखाना यंदाच्या हंगामापासून सुरू होणार : राजारामबापू पाटील कारखान्याकडून गाळपाच्या तयारीला वेग

0

जत/श्रीकृष्ण पाटील 


जत तालुक्यातील तिप्पेहळळी येथील 2500 मे.टन. गाळप क्षमता असलेला राजारामबापू शेतकरी सहकारी साखर कारखाना लि.राजारामनगर युनिट नं.4 तिप्पेहळळी हा साखर कारखाना दि.15 ऑक्टोबर 2020 पासून सुरू करण्यात येत असल्याने जत तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी, उसतोडणी मुकादम, ऊस वाहतूकदार, बेरोजगार युवक तसेच साखर कारखान्यावर अवलंबून असलेल्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.तालुक्यातील तिप्पेहळळी येथील राजे विजयसिंह डफळे शेतकरी सहकारी साखर कारखाना उभारणीत जत नरेश श्रीमंत विजयसिंहराजे डफळे यांचा सिंहाचा वाटा आहे. 

हा साखर कारखाना सुरूवातीला चांगल्या प्रकारे सुरू होता. परंतु या कारखान्यात राजकारण आल्याने हा साखर कारखाना दिवाळखोरीत निघाला आहे.कारखाना दिवाळखोरीत निघाल्याने तत्कालीन सहकारमंत्री ना.डाॅ. पतंगराव कदम यांनी या कारखान्यावर प्रशासकाची नेमणूक केली. तत्पूर्वी राजारामबापू शेतकरी सहकारी साखर कारखाना लि.राजारामनगर या कारखान्याचे सर्वेसर्वा ना. जयंतराव पाटील यांनी हा साखर कारखाना सहावर्षाच्या भाडेकराराने चालविण्यास घेतला होता. 

सुरुवातीला राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष पी.आर.पाटील यांच्या कुशल नेतृत्वाखाली हा साखरकारखाना चांगल्या प्रकारे चालविण्यात आला ही,परंतु त्यानंतर जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने तालुक्यात उस कमी पडू लागल्यामुळे कारखाना प्रशासनाने कर्नाटक राज्यातून उसाची वाहतूक करून तसेच पलूस तालुक्यातील ऊसउत्पादक शेतकरी यांचा उस आणून कारखाना चालू ठेवला होता.





परंतु तत्कालीन सहकारमंत्री ना. डाॅ.पतंगराव कदम यांनी या चांगल्या प्रकारे सुरू असलेल्या साखर कारखान्यावर प्रशासकाची नेमणूक केल्याने या कारखान्यात मोठे राजकारण सुरू झाले. त्यातच जत तालुक्यात भिषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने तालुक्यातील उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटले. त्यामुळे  कारखाना बंद करावा लागला.कारखाना जास्त दिवस बंद असल्याने कारखान्यावर असलेला कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढतच गेल्याने शेवटी साखरकारखाना दिवाळखोरीत काढण्यात आला.



ना. जयंतराव पाटील यांच्या राजारामबापू शेतकरी सहकारी साखर कारखाना लि.राजारामनगर या कारखान्याने सर्वाधिक बोलीने जत कारखाना विकत घेतला. त्यानंतर त्याला राजारामबापू शेतकरी सहकारी साखर कारखाना लि.राजारामनगर, तिप्पेहळळी युनिट नं.4 असे नाव दिले. तालुक्यात हा साखर कारखाना वगळता मोठे औद्योगिक असे कोणतेच उद्योगाचे साधन नाही. हे उद्योगाचे केंद्रच बंद पडल्याने जत तालुक्यातील कारखान्यावर अवलंबून असणारे लोक रोजगारासाठी परराज्यात गेले आहेत. आता हे औद्योगिक विकासाचे केंद्रबिंदू असलेला तिप्पेहळळी येथील राजारामबापू शेतकरी सहकारी साखर कारखाना लि.राजारामनगर. युनिट नं.4 हा साखरकारखाना लवकरच चालू झालेला आपणाला दिसणार आहे. 

Rate Card



तसेच कारखान्याची चिमणी पेटून जत तालुक्यातील गावोगावी ऊस वाहतूकदार यांची वाहने रस्त्यावरून फिरताना दिसणार आहेत. त्याचप्रमाणे कारखान्यामुळे जत शहरासह तालुक्यातील व्यापारामध्ये वाढ होणार आहे. 


सध्या हा साखरकारखाना राजारामबापू शेतकरी सहकारी साखर कारखाना लि.राजारामनगर. या कारखान्यांकडून सुरू करण्याच्या जोरदार हालचाली सुरू असून त्या दृष्टीने वृत्तपत्रातून उसनोंदणी करणे, उसतोडणी व ऊसवाहतूकदार नेमणेकामी निविदाही प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यातील जेष्ठ नेते ना. जयंतराव पाटील हे तिप्पेहळळी साखर कारखाना मोठ्या उमेदीने व जिद्दीने सुरू करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करित आहेत.



 जत तालुक्यातील उूस उत्पादन करणारे शेतकरी, ऊसवाहतूकदार, उसतोडणी मुकादम, तालुक्यातील यापूर्वीच या कारखान्यात काम केलेले अनुभवी कारखाना कर्मचारी व कामगार तसेच तालुक्यातील बेरोजगार व या साखर कारखान्यावर अवलंबून असलेले. हजारो लोकाच्या हा कारखान्यामुळे रोजगार मिळणार म्हणून  सर्वांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.


जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयंतरावजी पाटीलसाहेब यानी जत येथील बंद पडलेला दुष्काळी जत तालुक्याच्या  विकासाचा केंद्रबिंदू असलेला तिप्पेहळळी येथील ओसाड माळरानावर राजे विजयसिंह डफळे शेतकरी सहकारी साखर कारखाना हा साखरकारखाना राजारामबापू शेतकरी सहकारी साखर कारखाना लि.राजारामनगर ,तिप्पेहळळी युनिट नं. 4 हा साखरकारखाना ऑक्टोबर 2020 पासून सुरू करण्याची पूर्ण तयारी केली आहे. तसेच म्हैशाळ योजनेचे पाणी जत तालुक्याच्या कानाकोपरे पर्यंत पोहचविण्याचे त्यांचे  प्रयत्न सुरु आहेत.म्हैशाळ योजनेचे पाण्यामुळे तालुक्यातील उसाचे क्षेत्र वाढत चालले आहे. तालुक्यातील उस उत्पादक  शेतकरी यानी आपला उस बाहेरील राज्यात न पाठविता तो राजारामबापू शेतकरी सहकारी साखर कारखाना लि.राजारामनगर, तिप्पेहळळी युनिट नं. 4 या साखरकारखान्याला घालावा असे आवाहन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.