करजगी,वार्ताहर : करजगी (ता.जत) लगतच्या गावात कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने गुरूवारपासून पाच दिवस लॉकडाऊन करण्यात आले आहे.
करजगीपासून 12 किलोमीटर वरील संख व उमदी येथे कोरोना बाधित रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे करजगीत भितीचे वातावरण पसरले आहे.भविष्यात कोरोनाचा प्रभाव वाढू नये म्हणून पाच दिवस गाव शंभर टक्के कडकडीत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती,ग्रामपंचायतीकडून देण्यात आली.
करजगी ता.जत येथे गुरूवारपासून संपूर्ण गाव लॉकडाऊन करण्यात आले आहे.