लाॅ.राजेन्द्र आरळी व लायनेस सौ. सुरेखा पतंगेंचा वाढदिवस उत्साहात

0

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते प्रतिष्ठित व्यक्ती व लाॅयन्स क्लब कॅबिनेट ऑफीसर व गायक राजेन्द्र आरळी आणि जत तालुका शिवसेना संघटक, कामगार सेना राज्य उपाध्यक्ष, लायन्स क्लब झोन चेअरमन व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ भरारी पथक सदस्य दिनकर पतंगे यांच्या पत्नी लायनेस सौ.सुरेखा पतंगे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा वाढदिवस सोशल डिस्टन्स ठेवून साजरा करण्यात आला.वाढदिवसाच्या निमित्ताने जत तालुक्यातील काही गोरगरीब कामगार,शेतकरी,एसटी कर्मचारी वर्ग व कलाकार यांना मास्क वाटप केले. त्यासोबत शिवभोजन थाळी जत तालुक्यातील सर्व गोरगरिबांना मोफत वाटप करण्यात आले. हा वाढदिवस जत बसस्थानक, धनलक्ष्मी पतसंस्था व आरळी हाॅस्पिटल येथे साजरा करण्यात आला. यावेळी जत तालुक्यातील सुप्रसिद्ध डॉ.रविद्र आरळी,लायन्स अध्यक्ष प्रशांत अंकलगी, राठोड मॅडम, सायगावकर साहेब, किट्टद सर, सहदेव माळी उर्फ एम जगदीश सर, राजू सावंत, राहुल सोनार, शिवाजी सावंत, गिरीश कुलकर्णी, सुनिल हुन्नुरे, पैंगबर ह्याळकर, आप्पासो चौगुले, तसेच जतमधील काही प्रतिष्ठित व्यक्ती व तरूण मित्र मंडळी हे सर्वजण उपस्थित होते.Rate Card

जत येथील लाॅ.राजेन्द्र आरळी व लायनेस सौ. सुरेखा पतंगेंचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.