संख,उमदी,दरिबडचीतील बाधित रुग्णाच्या | संपर्कातील 31 जण संस्था क्वॉरंटाईन

0

संख,वार्ताहर : संख,उमदी,लमाणतांडा (दरिबडची) ता.जत येथे कोरोनाचे रुग्ण आढळून येताच खबरदारी घेण्यात आली आहे.कोरोना रुग्ण सापडलेला परिसर सील केले असून कंन्टेनमेंट झोन करण्यात आले आहेत.बाधित रुग्णाच्या संपर्कातील उमदी 10,संख 11,लमाणतांडा 10 अशा 31 जणांना संस्था क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. तर लांबच्या संपर्कातील लोंकाना होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. तालुका प्रशासन व ग्रामपंचायती अलर्ट झाल्या आहेत.गावात औषध फवारणी करण्यात आली आहे.

जाडरबोबलाद येथे आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत असलेले संख येथील एका व्यक्तीला कोरोनाची लागन झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यांच्या जवळच्या संपर्कातील 11 जणांना संस्था क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. लांबच्या संपर्कातील लोकांना होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.

Rate Card

त्याचबरोबर उमदी येथील एका व्यवसायिकाला कोरोनाची लागन झाल्याचे स्पष्ट होताच त्यांच्या संपर्कातील 10 जणांना संस्था क्वॉरंटाईन करत परिसर सील केला आहे. कॉग्रेस नेते निवृत्ती शिंदे यांनी तातडीने परिसरात उपाय योजना करण्याच्या सुचना देत,संसर्ग वाढू नये म्हणून प्रयत्न सुरू केले आहेत. लमाणतांडा(दरिबडची) येथे एक जण कोरोना बाधित आढळून येताच लमाणतांडा परिसर सील करण्यात आला आहे. या रुग्णाच्या जवळच्या संपर्कातील 10 जणांना संस्था क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.

संखच्या संरपच मंगलताई  पाटील,ग्रामसेवक के.डी.नरळे यांनी थेट कोरोना बाधित रुग्ण राहत असलेला परिसर गाठत परिसर औषध फवारणी करत निर्जंतूकीकरण करण्याच्या सुचना देत,उपाय योजना सुरू केल्या आहेत.त्याशिवाय संख प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकाकडून परिसरातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.

संख ता.जत येथे कोरोना बाधित रुग्ण आढलेला परिसर सील करण्यात आला आहे.

बुध, ८, जुलै २०२०, ९:४२ म.उ. ला संकेत टाइम्स LIVE TV ने <sansankettimes@gmail.com> लिहीला:

संख,उमदी,दरिबडचीतील बाधित रुग्णाच्या संपर्कातील 31 जण संस्था क्वॉरंटाईन

संख,वार्ताहर : संख,उमदी,लमाणतांडा (दरिबडची) ता.जत येथे कोरोनाचे रुग्ण आढळून येताच खबरदारी घेण्यात आली आहे.कोरोना रुग्ण सापडलेला परिसर सील केले असून कंन्टेनमेंट झोन करण्यात आले आहेत.बाधित रुग्णाच्या संपर्कातील उमदी 10,संख 11,लमाणतांडा 10 अशा 31 जणांना संस्था क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. तर लांबच्या संपर्कातील लोंकाना होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. तालुका प्रशासन व ग्रामपंचायती अलर्ट झाल्या आहेत.गावात औषध फवारणी करण्यात आली आहे.

जाडरबोबलाद येथे आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत असलेले संख येथील एका व्यक्तीला कोरोनाची लागन झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यांच्या जवळच्या संपर्कातील 11 जणांना संस्था क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. लांबच्या संपर्कातील लोकांना होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.

त्याचबरोबर उमदी येथील एका व्यवसायिकाला कोरोनाची लागन झाल्याचे स्पष्ट होताच त्यांच्या संपर्कातील 10 जणांना संस्था क्वॉरंटाईन करत परिसर सील केला आहे. कॉग्रेस नेते निवृत्ती शिंदे यांनी तातडीने परिसरात उपाय योजना करण्याच्या सुचना देत,संसर्ग वाढू नये म्हणून प्रयत्न सुरू केले आहेत. लमाणतांडा(दरिबडची) येथे एक जण कोरोना बाधित आढळून येताच लमाणतांडा परिसर सील करण्यात आला आहे. या रुग्णाच्या जवळच्या संपर्कातील 10 जणांना संस्था क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.

संखच्या संरपच मंगलताई  पाटील,ग्रामसेवक के.डी.नरळे यांनी थेट कोरोना बाधित रुग्ण राहत असलेला परिसर गाठत परिसर औषध फवारणी करत निर्जंतूकीकरण करण्याच्या सुचना देत,उपाय योजना सुरू केल्या आहेत.त्याशिवाय संख प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकाकडून परिसरातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.

संख ता.जत येथे कोरोना बाधित रुग्ण आढलेला परिसर सील करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.