डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानावर हल्ला करणाऱ्यांवर कारवाई करा

0
2

जत,प्रतिनिधी : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असणाऱ्या राजगृहावर हल्ला केलेल्या आरोपीवर कडक कारवाई करावी,या मागणीचे निवेदन जत युवक राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने प्रांताधिकारी प्रंशात आवटे, तहसीलदार सचिन पाटील यांच्याकडे

दिनांक 07 जुलै 2020 रोजी संध्याकाळी दोन अज्ञान समाजकंटकांनी डॉ. बाबासाहेबांचे निवासस्थान म्हणून ओळख असणाऱ्या राजगृहावर हल्ला केला असून घराबाहेरील कुंड्या, खिडकीच्या काचा तसेच सीसीटिव्ही कमेऱ्याचे देखील नुकसान केले आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. व या ठिकाणाला जगभरातून लाखो आंबेडकरांचे अनुयायी भेट देत असतात. राजगृह हे आंबेडकर प्रेमी व विचारांचे अनुयायी असणाऱ्यांचे महत्वाचे ठिकाण आहे. पुस्तकप्रेमी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तकांक साठी घर बांधुन याठिकाणी निवास केला होता. तसेच परिवर्तनाच्या चळवळीची कित्येक बीजे याच घरात रोवल्या होत्या.त्याच निवासस्थानावर काही समाज कंटकांनी भ्याड हल्ला केला आहे.या हल्ल्यामुळे आंबेडकर प्रेमी व विचारांचे अनुयायी असणाऱ्या जनतेत अत्यंत संताप उसळला आहे.या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी,अशी मागणी आंबेडकर प्रेमी,विचारांचे अनुयायी व राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या वतीने या घटनेचा जाहीर निषेध करतो.तरी सदर आरोपीचा लवकरात लवकर तपास करुन त्यांना योग्य ती कठोर शिक्षा करावी,असे निवेदनात म्हटले आहे.

राष्ट्रवादी युवक जिल्हा उपाध्यक्ष अशोक कोळी, युवक तालुकाध्यक्ष उत्तम चव्हाण, पवन कोळी,तालुकाध्यक्ष विद्यार्थी संघटनेचे हेमंत खाडे, रुपेश पिसाळ सागर चंदनशिवे,राहुल बामणे, जयंत भोसले, मयूर माने,अमरसिंह मानेपाटील, व अन्य पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असणाऱ्या राजगृहावर हल्ला करणाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन देण्यात आले.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here