जत,प्रतिनिधी : गोंधळेवाडी ता.जत येथील श्री.मरगम्मा देवीच्या यात्रेनिमित्य गावात तसेच रस्त्याकडेला पाचशे झाडे लावण्याचा संकल्प गोंधळेवाडी येथील श्री.मरगम्मा देवी यात्रा कमिटीने केला आहे.कमिटीच्या या निर्णयाचे स्वागत करत चिकलगी मठाचे मठाधिपती, समाजसेवक तुकाराम बाबा महाराज यांनी वृक्षारोपणासाठी यात्रा कमेटीला 500 झाडे देण्याचे जाहीर केले.
यात्रेचे निमित्य साधून गोंधळेवाडीत वृक्षारोपणाला ही सुरुवात करण्यात आली.चिकलगी मठाचे मठाधिपती, समाजसेवक तुकाराम बाबा महाराज व मुंबईचे पोलीस निरीक्षक महेंद्र दोरकर यांच्याहस्ते वृक्षारोपनास सुरूवात करण्यात आली.
जत पूर्व भागात गोंधळेवाडी येथे श्री. मरगम्मा देवीची यात्रा दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. मुंबई, पुणे सह कर्नाटकातुनही मोठ्या संख्येने भाविक यात्रेला येतात.यंदा कोरोनामुळे यात्रा रद्द करण्यात आली आहे. यात्रा रद्द करण्यात आली असली तरी यात्रा काळातील धार्मिक विधी पाच जणांच्या प्रमुख उपस्थिती नित्य नियमाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सचे पालन करत सर्व विधी पार पाडले जात आहेत.
यात्रेच्या निमित्याने यात्रा कमिटीच्या वतीने गोंधळेवाडी गावात,परिसरात, रस्त्याकडेला पाचशे झाडे लावण्याचा संकल्प केला आहे.यात्रा कमिटीच्या माध्यमातून हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे. या भागात पाचशे झाडे लावून त्याची जपणूक करण्यात येणार आहे. चिकलगी मठाचे मठाधिपती यांच्याकडून रोपे देण्यात येणार आहेत.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते परशुराम दोरकर, मुंबईचे पोलीस निरीक्षक महेंद्र दोरकर, प्रहार संघटनेचे राज्य संपर्क प्रमुख रामदास खोत, अँड. हिरालाल धुमाळ,प्रफुल दोरकर,अप्पासाहेब भोसले,भैय्यासाहेब भोसले, सतीश भोसले,प्रेमदास भोसले,मऱ्याप्पा धुमाळ, धनाप्पा राठोळ,गोंधळी समाज संघटनेचे सिद्राया मोरे गोंधळेवाडी,अंकुश धुमाळ,रेवण वाघमोडे,संजय दोरकर , मोहन धुमाळ,शिवसेनेचे जत तालुका संपर्क प्रमुख गणेश टोणे,सिद्राया मोरे
पोलीस पाटील अविनाश धुमाळ, दत्ता सावळे, विलास दोरकर,जयदीप मोरे आदी उपस्थित होते.
वृक्षारोपनासाठी पुढाकार घ्यावा;तुकाराम बाबा महाराज
जत तालुक्यातील दुष्काळ हटविण्याच्या मोहित वृक्ष लागवड व संगोपन ही महत्वाची भूमिका आहे.मी ती पुर्ण क्षमतेने तालुक्यात राबविणार आहे.अन्य सामाजिक संस्था,व्यक्तींनी या कामासाठी पुढाकार घेत,वृक्ष लागवड्याच्या मोहिमेत योगदान द्यावे,असे आवाहन तुकाराम बाबा यांनी केले.
गोंधळेवाडीत वृक्षारोपन करताना चिकलगी मठाचे मठाधिपती, ज्येष्ठ समाजसेवक तुकाराम बाबा महाराज, मुंबईचे पोलीस निरीक्षक महेंद्र दोरकर रामदास खोत