सर्व मार्केट्,दुकाने आता सर्व दिवस सुरू ठेवण्यास परवानगी ; जिल्हाधिकारी

0

सांगली : सांगली जिल्हा स्थलसीमा हद्दीतील सर्व मार्केटस् व दुकाने यांना आठवड्यातील सर्व सात दिवस सकाळी 9 ते सांयकाळी 7 पर्यंत सुरू ठेवण्यास शासन निर्देशानुसार जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी परवानगी दिली आहे. सदर आदेशाची अंमलबजावणी दि. 9 जुलै 2020 रोजीचे 00.01 वाजल्यापासून करण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.

Rate Card

 एखाद्या ठिकाणी गर्दी होवून सामाजिक अंतराच्या नियमाचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यास तात्काळ मार्केटस् व दुकाने बंद करण्यात येतील, असे जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले आहे. यापूर्वी अत्यावश्यक सेवा व औषधी दुकाने वगळून सर्व मार्केटस् व दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. या कालावधीत शासन निर्देशानुसार बदल करून आता अत्यावश्यक सेवा व औषधी दुकाने वगळून सर्व मार्केटस व दुकाने आठवड्यातील सर्व दिवस सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे . 

वेळोवेळी कंटेनमेंट झोन म्हणून अधिसूचित करण्यात आलेल्या प्रत्येक स्थलसीमा हद्दीत सदरचा आदेश लागू राहणार नाही. तथापि अशा क्षेत्रापुरते यापूर्वी जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून पारित केलेले सर्व प्रतिबंधात्मक आदेश लागू राहतील. या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्ती विरुद्ध भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार, गुन्हे दाखल करण्याकामी सांगली जिल्ह्यातील संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी / कर्मचारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जारी केला आहे.

स्व:ताचे घोडे दामटण्यासाठी बंद लादणाऱ्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल होणार

जत तालुक्यातील डफळापूर, माडग्याळ, शेगावसह अनेक गावातील काही पदाधिकाऱ्यांच्या हेकेखोर पणामुळे सामान्य नागरिक,व्यापाऱ्यावर बंद लादण्यात आला आहे. गावात किंबहुना आसपास सुमारे 10 किलोमीटर वरील गावातही कोरोनाचे रुग्ण नसतानाही तालुका प्रशासनाची परवानगीनसतानाही बंद लादण्याचा प्रकार झाला आहे. त्यांच्या या एकतर्पी निर्णयाला यामुळे चपराक बसणार आहे.यापुढे बेकायदेशीर पणे बंद पुकारणाऱ्या विरोधात शासनाच्या आदेशाचा भंग केला म्हणून अशा व्यक्ती विरुद्ध भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार, गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलीसांना जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.