जत,प्रतिनिधी: कोरोनाच्या काळात आरोग्य कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत.त्याच्या स्वरक्षणाठी जतचे तहसीलदार सचिन पाटील यांनी केमिस्ट्र असोसिएशन जत यांना पीपीए किट मिळण्याबाबत आव्हान केले होते.तात्काळ असोसिएशनच्या सर्व पदाधिकारी यांनी बैठक घेऊन आरोग्य कर्मचाऱ्यांना पीपीए किट देण्याचा निर्णय केला.पीपीए किट व गॉगल तहसीलदार सचिन पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले
यावेळी जत तालुका केमिस्ट्र असोसिएशन जत तालुका अध्यक्ष भगवान पवार,सेक्रेटरी बाहुबली मालगती, संचालक सुनील घाटगे,शहराध्यक्ष अजिक्य शिंदे,राजू कोळी,भूषण काळगी,मनोज पाटील, राजू कोरे,कुशल मुडेचा, राजू आरळी, रोहित बिराजदार, सार्थक संख व संतोष माळी उपस्थित होते.
तहसीलदार सचिन पाटील म्हणाले की, कोविड सेंटर येथे सुरक्षा कर्मचारी यांना पुरेसे पीपीए किट उपलब्ध नसल्याने केमिस्ट्र असोसिएशनला किट उपलब्ध करून देण्याचे आव्हान आम्ही केले होते.त्याच्याकडून आम्हाला तात्काळ प्रतिसाद मिळाला.त्यांचे प्रशासनाच्या वतीने आभारी आहोत.
जत तालुका केमिस्ट्र असोसिएशनचे तालुका अध्यक्ष भगवान पवार म्हणाले की,सध्या कोरोना कोविड सेंटर येथे या पीपीए किट व गॉगलची गरज असल्याची माहिती आम्हाला प्रशासनाकडून मिळाली होती.त्यानुसार आम्ही हे साहित्य तहसीलदार पाटील यांच्याकडे सुपुर्द केले आहे. यामुळे कोरोना विरोधातील प्रशासनाच्या लढ्याला सुरक्षा कवच मिळणार आहे.
जत तालुका केमिस्ट्र व ड्रॅगिस्ट असोसिएशनच्या वतीने प्रशासनाला हातभार म्हणून पीपीए किट व गॉगल तहसीलदार सचिन पाटील यांच्याकडे सुपूर्द केले.