जतेत दूध दरवाढीसाठी अनोख्या पद्धतीने शासनाचा निषेध | विठूरायला दुग्धाभिषेक सरकारला जागे करण्याचे साकडे

0
Rate Card

जत,प्रतिनिधी : कोसळेले दुध दर वाढीसाठी जतेत रासपकडून विठूरायला दुग्धाभिषेक सरकारला जागे करण्याचे साकडे आनोख्या पध्दतीने आंदोलन करण्यात आले.

राज्यात मोठ्या प्रमाणात उतरलेले दुधदर वाढवावेत म्हणून गेल्या महिन्यापासून रासपकडून पाठपुरावा सुरू आहे.परंतु अद्याप शासनाने कोणताही निर्णय घेतलाा नाही.परिणामी 

जतेत संतप्त रासप पदाधिकाऱ्यांनी जत तहसिल कार्यालय येथे पंढरीच्या विठ्ठलाच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालून सरकारला सद्बुद्धी दे जागे कर म्हणून साकडं घालत. सरकारचा शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध व्यक्त केला.

यावेळी रासप नेते अजित पाटील, सांगली जिल्हाध्यक्ष मारुती सरगर, तालुकाध्यक्ष किसन टेंगले, अल्पसंख्याक आघाडी जिल्हाध्यक्ष अकिल नगारजी, तालुका उपाध्यक्ष लक्ष्मण पुजारी, शहराध्यक्ष भूषण काळगी, माजी तालुकाध्यक्ष विठ्ठल पुजारी, सर्वोदय पतसंस्थेचे संचालक रामचंद्र मदने, धनाजी मोटे, दशरथ बंडगर, राजू कोळी, विष्णु सरगर यांच्या सहित रासपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

गेल्या 4 महिन्यात लॉकडाऊनचे कारण देत दुधाचा दर 34 वरून 20 रुपयांवर दुध संघानी आणला आहे.दुसरीकडे हेच कारण देत पशुखाद्याचे दर वाढविण्यात आले आहेत.त्यामुळे शेतकऱ्याला पशुधन जगवणे मुश्कील झाले आहे.अगोदर लॉकडाऊन मुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्याने अडचणीतील दुध दर पाडून आणखीन अडचणीत आणले आहे.सध्या या गंभीर परिस्थिती शेतकऱ्यांच्या दुधाला प्रतिलीतर 35 रुपये भाव मिळाला पाहिजे. गेल्या सरकारने ज्या पद्धतीने शेतकऱ्याच्या खात्यावर लिटरला 5 रुपये अनुदान जमा केले,तसे आत्ताच्या परिस्थितीत प्रति लिटर किमान 10 रुपये अनुदान हे थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा व्हावे.दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी तात्काळ विशेष बजेट देण्यात यावे. या मागणीसाठी विठ्ठलाच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालून सरकारला सद्बुद्धी दे जागे कर आमच्या शेतकरी राजाच्या दुधाला रास्त भाव मिळू दे म्हणून साकडं घालीत सरकारचा निषेध व्यक्त केल्याचे रासपचे माजी जिल्हाध्यक्ष अजित पाटील यांनी सांगितले.

यापुढेही दुध दरवाढ झाली नाही तर आक्रमक आंदोलन करू असा इशाराही पाटील यांनी दिला.

दुध दरवाढ करावी,सरकारला सुद्बुद्धी द्यावी,म्हणून पंढरीच्या विठ्ठलाला रासपच्या वतीने दुधाचा अभिषेक घालण्यात आला.  

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.