जत,प्रतिनिधी : जत नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदी मनोज देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे.मावळते मुख्याधिकारी अभिजीत हराळे यांची तडकाफडकी कार्यमुक्त करण्यात आले आहे.
मनोज देसाई हे बुटीबोरी नगरपरिषद,जि.नागपूर येथे कार्यरत होते.त्यांना जत नगरपरिषदेच्या मुख्य अधिकारी पदाचा पदभार स्विकारण्याचे आदेश अवर सचिव सचिन सहस्ञबुध्दे यांनी काढले आहेत.