जत पोलीसांची वैद्यकीय तपासणी

0

जत,प्रतिनिधी : जत पोलीस ठाण्यातील अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस ठाण्याचे

प्रशिणार्थी डिवायएसपी निलेश पालवे यांनी तपासणीचे नियोजन केले.

जत येथील प्रसिद्ध डॉक्टर रोहन मोदी,सचिन वाघ,मल्लिकार्जुन काळगी,प्रदिप पाटील,धनंजय खोत,जगदीश गायकवाड,सुनिल वणकुद्रें,संजय व्हनकंडे यांच्या पथकाने सुमारे दिडशे पोलीस व पोलीस मित्रांची तपासणी केली.

Rate Card

ऑक्सीजन सँच्यूरेशन,थँरमल सेंसर द्वारे तापमानाची तपासणी केली.त्याशिवाय रक्तदाबही तपासण्यात आला.सर्व पोलीसाच्या या तपासणीच्या नोंदीही घेण्यात आल्या आहेत.भविष्यातील खबरदारी म्हणून हे कोरोनाच्या लढाईत योध्दा म्हणून काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.तपासणीत सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची प्रकृत्ती सदृढ असल्याचे उपस्थित डॉक्टरांनी सांगितले.

किरकोळ आजारी असलेल्या कर्मचाऱ्यांना औषध उपचार करण्यात आले.

जत पोलीसाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.