जत,प्रतिनिधी : बिळूरमध्ये अखेर कोरोनाचा प्रभाव कमी करण्यात प्रशासन यशस्वी होत असल्याचे समोर येत आहे. आज रविवारी सायकांळी पाच वाजेपर्यत 32 जणाच्या अहवालपैंकी फक्त 1 जण कोरोना बाधित आढळून आला आहे.गेल्या तीन दिवसात वाढलेली संख्या आटोक्यात आणण्यात आरोग्य यंत्रणांना यश मिळाले आहे.
बिळूरमध्ये आठ दिवसापुर्वी पहिला कोरोना बाधित रुग्ण सापडला होता.त्यांची लक्षणे लवकर आढळून आली नसल्याने संसर्ग वाढला होता.पहिल्या आठवड्यात या कोरोना बाधितामुळे रुग्ण संख्या 50 पर्यत पोहचली होती.मात्र तालुका आरोग्य प्रशासनाने खबरदारी घेत कोरोनाचा आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला मोठ्या प्रमाणात यश येत आहे.रविवारी बाधित संख्या घटली आहे.त्याशिवाय बिळूरमधील संशयिताचे स्वाब तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.संस्था,होम क्वॉरंटाईन मुळे बाधितांचे संसर्क रोकण्यात आले आहेत. दुसरीकडे संरपच नागनगौडा पाटील यांनी गावात औषध फवारणी,स्वच्छतेची मोहिम प्रभावीपणे राबवून दक्षता घेण्यात आली आहे.