प्रशासनाकडून कोणताही बंद नाही ; तहसीलदार सचिन पाटील | जत,डफळापूरचा बंद कुणाच्या आदेशावरून

0

जत,प्रतिनिधी : जत शहरासह तालुक्यातील कोणत्याही गावात प्रशासनाकडून बंद करण्यात आलेला नाही.त्यामुळे बंद अधिकृत्त नाही.जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनीही शनिवारीच याबाबत स्पष्ट केले,असल्याची माहिती तहसीलदार सचिन पाटील यांनी सांगितले.

बिळूर येथे कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने आम्ही प्रशासनाच्या वतीने सर्वोत्तपरी कोरोनाचा संसर्ग रोकण्यासाठी प्रयत्न करत आहोत.कोरोना बाधिताची साखळी तोडण्यासाठी आरोग्य विभागाकडून खबरदारी घेण्यात आली आहे.आज रविवारी रुग्णाची संख्या कमी झाली आहे.सायकांळी पाचपर्यत आलेल्या अहवालानुसार 32 जणापैंकी 1 कोरोना बाधित आढळून आला आहे. तर अन्य नऊ जणाचे अहवाल प्राप्त झालेले नाहीत,असेही तहसीलदार पाटील म्हणाले.

बिळूरमध्ये सध्या कंन्टेटमेंट झोन करण्यात आले आहे.बिळूरमधील संशयित वाटणाऱ्या नागरिकांचे स्बाव तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.

Rate Card

बिळूरमधून कुणालाही बाहेर सोडले जात नाही.  

परिणामी जत तालुक्यात बिळूर वगळता कुठेही प्रशासनाकडून बंद पुकारण्यात आलेला नाही.किंवा बंदबाबत शासनाचे कोणतेही आदेश नाही.त्यामुळे परस्पर कुणीही बंद पुकारू नये,असेही तहसीलदार पाटील म्हणाले.

सोशल डिस्टसिंगचा अवलंब करावा

जत शहरासह तालुक्यातील प्रमुख गावातील व्यापारी पेठेतील दुकानदारांना सोशल डिस्टसिंगचा अवलंब करावा,मास्क,सँनिटायझर, हँडग्लोज वापरावेत,अशा सुचना यापुर्वी आम्ही दिल्या आहेत.त्या सुचनाकडे कुणीही दुर्लक्ष करू नये.ग्राहकांनी व्यापाऱ्यांना सहकार्य करावे.प्रशासनाकडून कोणताही बंद पुकरण्यात आलेला नाही.

 सचिन पाटील,तहसीलदार

शासनाच्या परवानगी नसताना बंद कोणाच्या आदेशावरूनजत शहरासह,डफळापूर येथे शासनाचे आदेश नसतानाही बंद कोणाच्या आदेशावरून पुकारला आहे.जतमध्ये व्यापाऱ्यांनी परस्पर बंद पुकारण्याला नेमकी कुणी संमती दिली याबाबत खुलासा व्हावा.जत नगरपरिषदेची याला मुक संमिती आहे काय?बंद जनतेवर लादून वेठीस धरण्याचे प्रकार बंद करावेत.कोरोना प्रभाव कमी करण्यासाठी प्रशासन योग्य काम करत आहे.दुसरीकडे प्रशासनाने दिलेले नियम पायदळी तुडवून साध्य काय होणार आहे. बंद व त्यांनतरची गर्दी यामुळे धोका उद्भव शकतो,यांची खबरदारी घेण्याची खरी गरज आहे.विक्रम ढोणे, युवा नेते

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.