पो.नि.शेळकेच्या बदलीचे राजकारण थांबवावे : आप्पाराया बिराजदार

0

जत,प्रतिनिधी : पोलीस निरिक्षक रामदास शेळके यांच्यासारख्या वादग्रस्त व भ्रष्ट अधिकाऱ्याच्या बदलीचे माजी आमदार विलासराव जगतापांनी राजकारण करू नये,असा आरोप कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष आप्पाराया बिराजदार यांनी पत्रकार बैठकीत केला.

बिराजदार पुढे म्हणाले,कोरोना सारख्या महाभयानक आजाराने तालुक्यात थैमान घातले असताना माजी आमदार विलासराव जगताप हे जत शहर व तालुक्यात या आजारसंदर्भात कोणतेही प्रबोधन करताना दिसत नाहीत, तसेच समाज्यातील अडचणीतील कोणत्याही लोकांना कोणत्याही जीवनावश्यक वस्तूची मदत न करता पो.नि.शेळके सारख्या भ्रष्ट व वादग्रस्त अधिकाऱ्याच्या बदलीविरोधात स्वतः एक जबाबदार लोकप्रतिनिधी असताना देखील जत शहरातील बाजारपेठ जबरदस्तीने बंद करत होते.गेली दोन अडीच महिने जत बाजारपेठ बंद असल्याने व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आता कुठे बाजारपेठ सुरु होत असताना माजी आमदार विलासराव जगताप राजकारण करून ते बंद करत आहेत.

बिराजदार म्हणाले, पो.नि.शेळके यांनी ही बदली स्वतः ची विनंती बदली करून घेतली असून जगताप व त्यांचे समर्थक यात गलिच्छ राजकारण करत आहेत.याउलट त्याचदिवशी आमदार विक्रमसिंह सावंत हे जत तालुक्यातील पाणी प्रश्नासाठी कर्नाटक राज्याचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांच्याशी दोन राज्यामध्ये करार करून पाणी जत तालुक्याला कसे देता येईल यासंदर्भात चर्चा करीत होते.

Rate Card

तसेच आमदार सावंत हे आमदार झाल्यापासून सातत्याने गेल्या सहा महिन्यात जत तालुक्यातील पाणी प्रश्नासंदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,जलसंपदामंत्री जयंत पाटील,राज्यमंत्री विश्वजित कदम तसेच कर्नाटकचे मंत्री श्रीमंत पाटील, माजी गृहमंत्री कर्नाटक राज्य एम.बी.पाटील यांची वारंवार भेट घेऊन जत तालुक्यातील पाणी प्रश्नासंदर्भात चर्चा करून पाणी आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. माजी आमदार जगताप यांनी त्यांच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात विधान भवनामध्ये जत तालुक्यातील पाणी प्रश्नासंदर्भात एकदाही आवाज उठविला नाही. विधानभवनामध्ये एकदाच तोंड उघडले तेही पोलीस निरीक्षक पिंगळे यांच्या बदलीसंदर्भात कारण तालुक्यातील जेवढे अवैध धंदे होते व आहेत ते त्यांच्या बगलबच्चे व समर्थकांचे आहेत.त्यामुळे एका भ्रष्ट व वादग्रस्त पोलीस अधिकाऱ्याच्या विनंती बदली वरून गलिच्छ राजकारण जगतापांनी थांबवावे,असेही बिरादार म्हणाले.यावेळी माजी सभापती संतोष पाटील,बाबासाहेब कोडग,कार्याध्यक्ष सुजय शिंदे,नगराध्यक्ष शुभांगी बन्नेनवर,युवराज निकम,नगरसेवक साहेबराव कोळी,सभापती भूपेंद्र कांबळे,महिला कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सलीमा मुल्ला,महिला व बालकल्याण सभापती अश्विनी माळी,माजी नगरसेवक निलेश बामणे उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.