बोगस बी-बियाणे पुरवठा करणाऱ्या कंपन्यांविरोधात कोर्टात जाऊ

0

जत,प्रतिनिधी : सध्या पेरणीची लगभग चालू आहे. कोरोनाच्या संकटाने त्रस्त शेतकर्‍यांला अनेक अडचणीचा सामना करावा लागत असून पावसाळचे दिवस असल्याने संपूर्ण शेतकरी राजा पेरणीत गुंतला आहे. जत सारख्या दुष्काळी तालुक्यात सध्या पाऊस पडत असल्याने शेतकरी पेरणीच्या तयारीत आहे. सध्या जत तालुक्यात बाजरी, तूर, मूग, उडीद, भुईमूग यासारख्या पिकांची पेरणी चालू आहे. परंतु हे बि बियाणे बोगस निघत आहे.शेतकरी पावसाच्या लगबगीने या बियाणांची पेरणी करतो परंतु नंतर ते उगवून च येत नसल्याने सर्व शेतकरी हवालदिल व त्रस्त झाले आहेत. परत दुबार पेरणीचे संकट येत असल्याने आधीच लाॅकडाऊनमुळे पैसे नसल्याने पुन्हा कुठुन पैसे आणायचे हा मोठा प्रश्न शेतकर्‍यांपुढे पडला आहे. त्यातच शेतकर्‍यांच्या कोणताही मालाला भाव मिळत नसून ते फेकून देण्याची वेळ आली आहे. तर अशा प्रकारच्या बोगस बि-बियाणाची तक्रार जत तालुक्यात आढळल्यास त्याची गय केली जाणार नाही व त्या संबंधित कंपनीवर ग्राहक न्यायालय किवा कोर्टात कारवाई करण्यात येईल असे महाराष्ट्र कामगार सेना राज्य उपाध्यक्ष व माजी

तंत्र (कृषी) आधिकारी दिनकर पतंगे  यांनी सांगितले.तसेच शेतकर्‍यांनी बियाणेची पिशवी कट करताना खालच्या बाजूस कट करावी कारण वरती लेबल असेल तर तात्काळ त्या कंपनीवर कारवाई करण्यास सोपे जाईल याची दक्षता प्रत्येक शेतकर्‍यांनी घ्यावी. तर असे प्रकार आढळल्यास शेतकर्‍यांनी तात्काळ कृषी मंडळ अधिकारी किवा दिनकर पतंगे यांच्याशी 9404991212 या नंबरवर संपर्क साधा.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.