जत,प्रतिनिधी : बिळूर येथे कोरोना बाधित रूग्ण संख्येत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने जत धोका निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर जत शहर सोमवार दि.6 जुलै पासून 13 जूलैपर्यत आठ दिवस अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्णपणे लाॅकडाऊन करण्याचा
निर्णय व्यापारी संघटनेच्या वतीने घेण्यात आला आहे.
बिळूर येथे आजपर्यंत एकूण 50 कोरोना पाॅझीटीव्ह रूग्णासह तालुक्यातील संख्या 68 वर पोहचली आहे.बिळूर येथील कोरोना बाधित रूग्ण संख्येत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने बिळूर गाव संपूर्णपणे रेडझोन मध्ये टाकण्यात आले आहे.तरीही पोलीसांची नजर चुकवून काही लोक जत बाजार पेठेत येत असल्याचे समोर येत आहेत.त्यामुळे जत शहराला धोका होऊ नये यासाठी हे लॉकडाऊन करण्यात आले आहे.
या लॉकडाऊन काळात किराणा मालाची दुकाने ही सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत सोशल डिस्टन्सिंगचे पालन काटेकोरपणे करून चालू रहातील. दूध डेअरी सकाळी व संध्याकाळी चालू राहतील.खरीप हंगाम सुरू असल्याने कृषी दुकाने व अत्यावश्यक सेवा देणारे मेडिकल्स,दवाखाने सुरू राहणार आहेत.