जत,प्रतिनिधी : बिळूर ता.जत येथे कोरोना बाधित संख्या वाढत असल्याने जत शहर व कोरोना लागण असलेली व त्या गावालगतची गावे 7 दिवस पुर्ण लॉकडाऊन करावा,अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली.
जत तालुक्यातील बिळूर येथे आठवड्याभरापूर्वी एका इस्त्री (लॉड्री) व्यवसायिकापासुन त्या गावातील अनेक नागरिकांना कोरोना या संसर्गजन्य रोगाची लागण झाली आहे. गावात कोरोना या महारोगाचे कालअखेर 50 रुग्ण प्रशासनाला आढळून आले आहेत. बिळूर हे गांव कोरोना रुग्णांचे हॉटस्पॉट बनला शक्यता आहे. बिळूर व परिसरातील लोकांचा मोठा वावर जत शहरात असल्यामुळे व जत शहरात बाजारपेठामध्ये लोकांची प्रचंड गर्दी होते. त्यामध्ये एक किराणा दुकानदार,दोन आरोग्य सेविका, तसेच बिळूर गावातील कृषी सेवा केंद्र चालक, तसेच गावात शिंदी विक्री करणाऱ्या या सर्व व्यक्तींचा गावातील अनेक लोकांशी थेट संपर्क आलेला असलेने त्या गावात चर्चा असून जत शहरातील सर्व नागरिक भितीचे वातावरण पसरले आहे.
व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या सुमारे 387 पेक्षा जास्त नागरिकांना संस्था कॉरन्टाईन केले आहे. तसेच जत तालुक्यातील मेंढेगिरी गावात 1 व तिल्याळ गावात 1 व्यक्ती कोराना पॉझीटीव्ह सापडलेल्या आहेत.जत शहराची लोकसख्या खुपच जास्त आहे. सदर चा कोरोना हा संसर्गजन्य आजार जत शहरात आला तर त्यावर नियंत्रण मिळवणे खुप कठीण व अवघड होणार आहे. तरी जत शहरातील नागरिकांच्या हितासाठी सदर कोरोना या संसर्गजन्य रोगाची साखळी तोडण्यासाठी जत शहर व कोरोना लागण असलेली व त्या गावालगतची गांव दि.04/07/2020 पासुन 7 दिवस 100 टक्के पुर्ण लॉकडाऊन करण्यात यावीत अशी मागणी करण्यात आली आहे.
जतसह आसपासची गावे लॉकडाऊन करा,या मागणीचे निवेदन देताना पदाधिकारी