बिळूरमध्ये एकाच दिवसात 24 रुग्ण पॉझिटिव्ह | एका नेता बाधित ; एकूण संख्या 50 : 387 केले होम क्वॉरंटाईन

0

Rate Card

जत,प्रतिनिधी : बिळूर ता.जत येथे शुक्रवारी 24 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबंळ उडाली आहे.बिळूरची संख्या आता 50 झाली असून बिळूर कोरोना हॉटस्पाट झाले आहे.पहिला कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कामुळे बिळूरमध्ये कोरोनाचा कहर झाला आहे. गावातील सुमारे 100 वर संपर्कातील लोकाचे स्वाब तपासणी साठी घेण्यात आले आहेत.त्यापैंकी शुक्रवारी तब्बल 20 जणाचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत,अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय बंडगर यांनी दिली.

गेल्या आठवड्यात बिळूर येथे कोरोना बाधित रुग्ण आढळून आला होता.त् यांच्या संपर्कामुळे बिळूर कोरोनाचे हॉटस्पाट बनले आहे.पहिल्या बाधित रुग्णाचा आजार लवकर समजून आला नाही.अगदी प्रकृत्ती खालावू लागल्यानंतर त्यांचे कोरोना तपासणी करण्यात आली. त्यानंतर बिळूर पहिला कोरोना बाधित रुग्ण आढळून आला.तो पर्यत त्यांच्या संपर्का मोठ्या प्रमाणात लोक आले होते.त्यामुळे कोरोनाचा मोठा संसर्ग झाला आहे.पहिल्या बाधित रुग्णाचा मृत्यु झाला आहे. तर त्यांच्या संपर्कामुळे गावात कोरोनाचा मोठा कहर झाला आहे. आतापर्यत बिळूरमध्ये 50 रुग्ण आढळून आले आहेत. त्याच्यां संपर्कातील 63 जणाचे स्वाब घेण्यात आले होते.त्यापैंकी 33 जणांच्या तपासणीत 24 जण कोरोना बाधित आढळून आले आहेत.तर अद्याप 30 जणांचे अहवाल येणें बाकी आहेत. तर या सर्वाच्या संपर्कात आल्याने 387 जणांना होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.गावात आरोग्य विभागाची पथके तपासण्या करत आहेत.रुग्णाची संख्या 50 वर गेल्याने बिळूरला कोरोना हॉस्टपॉट घोषित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील यंत्रणाकडून आता बिळूरचा कोरोना बाधित साखळी तोडण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

युवा नेता कोरोना बाधितबिळूरमधील एका युवा नेत्यांचा कोरोना अहवाल शुक्रवारी पॉझिटिव्ह आल्याने खळबंळ उडाली आहे.बिळूरसह जत शहरातील अनेकांच्या संपर्कात हा युवा नेता आल्याचे समोर येत आहे. आरोग्य यंत्रना कडून संपर्कातील लोकांचा शोध सुरु आहे.

जत तालुक्यातील कोरोनाची स्थितीआजचे नविन पाॅझिटीव्ह रुग्ण : 24,उपचार्‍याखाली रुग्ण : 54,आजचे/आजअखेरचे बरे झालेले रुग्ण : 7,आज अखेर मृत झालेले रुग्ण : 3,आजतागायत एकूण पॉझिटीव्ह रुग्ण : 64,पॉझिटीव्ह पैकी चिंताजनक रुग्ण : 1,आज करोना मुक्त झालेले रुग्ण : 0,जत कोवीड सेंटरची पाॅझिटीव संख्या : 24,जत हायरिस्क संस्था विलगिकरण संख्या : 84

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.