उमदी,वार्ताहर : बोर्गी बु.ता.जत येथे बेकायदा दारू विक्री करणाऱ्या रमजान बंदगीसाब शेख यांच्या अड्ड्यावर छापा टाकत दारुच्या 50 रूपये किंमतीच्या 96 बॉटल जप्त करत एकूण 4800 रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.तसेच उमदी ग्रामपंचायती जवळ सुरु असलेल्या मटका अड्ड्यावर छापा टाकत संभाजी कांरडे याला ताब्यात घेत मटक्याचे साहित्य,520 रोख रक्कम जप्त केले.त्याशिवाय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियम तोडणाऱ्या 94 गाड्यावर कारवाई करत 18,800 रूपयाचा दंड वसूल केला.मास्क न वापरणाऱ्या 11 खटले दाखल केले.सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणाऱ्या 12 गुन्हे दाखल करत 2400 रूपयाचा दंड वसूल केला.सा.पो.नि.दत्तात्रय कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हि कारवाई करण्यात आली.