सत्ताधारी सभापतीच करणार आमरण उपोषण | जत नगरपरिषदेत मनमानी कारभार चव्हाट्यावर

0
1

जत,प्रतिनिधी : जत नगरपरिषदेच्या सत्ताधारी गटाच्या पाणी पुरवठा सभापती सौ.वनिता साळे य नगरपरिषदेच्या मनमानी कारभाराविरोधात दि.3-7-2020 रोजी उपविभागीय कार्यालय,जतच्या समोर आमरण उपोषणाला बसणार आहेत.सर्वात विशेष म्हणजे सत्ताधारी गटाच्या सभापतीच उपोषणास बसणार असल्याने पालिकेचा भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आला आहे.

तहसीलदार सचिन पाटील याना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,जत नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये नगरपरिषदेच्या माध्यमातून साहित्यरत्न लोकशाहिर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजने अंतर्गत कामे सुरू आहेत.याठिकाणी घेण्यात आलेली कामे अनुसूचित जातीच्या वसाहतींना डावलून घेतलेली आहेत.काही कामे अनुसूचित जातीच्या प्रत्योजनार्थ नसल्याने त्या कामास मी विरोध दर्शविला असतांनाही नगरपरिषदेने माझ्या तक्रार अर्जाची दखल न घेता काम चालू ठेवले आहे.ते नियमबाह्य असल्याने थांबवावीत अशी मागणी मी केली होती.मात्र बोगस कारभार रेटून चालविण्यात येत आहे.

याबाबत मी जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली असताना याची दखल घेण्यात आली.त्यामुळे नगरपरिषदेच्या मनमानी कारभाराविरोधात आमरण उपोषणाला बसणार असल्याचेही साळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here