हरीवर हवाला बंद करा,नागरिकांच्या सुरक्षेकडे लक्ष द्या ; अँड.श्रीपाद अष्टेकर

0

Rate Card

जत,प्रतिनिधी : एकीकडे जत तालुक्याला कोरोनाचा विळखा वाढत असताना तालुक्यातील गर्दी कमी

होण्या ऐवजी वाढत आहे. यावर कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने काहीच उपाय योजना केली जात नाही. ज्या वेळी कोरोनाचा तालुक्यात नव्हे जिल्ह्यातही पेशंट नव्हता तेव्हा एवढा कडक

बंदोबस्त होता, की सामान्य माणूस पोलीसांच्या भितीने घराबाहेर अत्यावश्यक कारणासाठीही बाहेर

पडण्याचे धाडस करीत नसे.आता गावा गावात रुग्ण वाढत असताना कायदा सुव्यवस्था धाब्यावर बसवली जात आहे. महसूल व आरोग्य विभाग त्या मानाने सतर्क आहे.पण गर्दी हटविण्याचे काहीच

उपाय केले जात नाहीत,नेमके पोलीस दलाला झाले आहे तरी काय,असा सवाल अँड.श्रीपाद अष्टेकर यांनी  उपस्थित केला आहे.जत शहरामध्ये तर कहर माजला आहे. शहरात दररोज बाजार भरत आहे. अस्ताव्यस्त लावलेली वाहने या मुळे वाहतूक कोंडी होत आहे.वाहतूक नियंत्रणासाठी काही उपाय योजना नाहीत भाजी बाजार पुन्हा रस्त्यावर आला आहे.भाजी मंडई ओस पडली आहे या निमित्ताने भाजी मंडई सुरु झाली होती ती चालु ठेवण्यासाठी नगर परिषदेस अपयश आले आहे. व्यापारी हवे तीथे बसत आहेत. अतिक्रमण वाढले आहे या कडे ना पोलीसांचे लक्ष आह, ना नगरपालिकेचे, सम विषम दुकाने उघडण्याचे धोरण वाहने लावण्याच्या योजना शनिवार बाजार पेठ बंद या योजना गुंडाळल्या गेल्या आहेत. दोन माणसामधील सुरक्षित अंतर कुठेच दिसत नाही अनेक नागरीक मास्क विना फिरत आहेत.दुचाकीवर पोलीसच डबल सीट फिरताना दिसतात, मग नागरीकांना अडविणार कोण यातून महामारीचा विस्फोट होईल या कडे कुणाचेच लक्ष नाही.राजकारण मात्र दररोज जोरात

चालु आहे.एक मेकावर कुरघोडी करण्यास राजकारण्यांना वेळ आहे.दररोज मास्क आणि सॅनिटायझर वाटणारे सामाजिक संस्था व कार्यकर्ते गायब आहेत.प्रसिद्धी पुरे झाली वाटते.पोलीस निरीक्षकाचा कॉग्रेस कार्यकत्याशी झालेला वाद व त्यांची स्वेच्छा बदली यावर राजकारण तापत आहे. परंतु गेले पंधरा दिवस जत शहरामधील पोलीस बंदोबस्त गायब झाला होता. तेव्हा हे राजकारणी कुठे गेले होते. पोलीस बंदोबस्त का नव्हता याची चिंता कोणालाच नव्हती. नगरसेवकाशी वाद झाला म्हणून बंदोबस्त काढून घेणे कायदा सुव्यवस्थेला व नियमाला धरुन आहे काय, शहरामध्ये प्रचंड गर्दी असताना एकही पोलीस रस्त्यावर दिसत नव्हता एक दोन होमगार्ड तेही महीलांना उभे करुन पोलीस कोणत्या बंदोबस्तात व चौकशीत गुंतले होते.याची कोणालाच फिकीर नव्हती.वरीष्ठ पोलीस अधिकारी व दंडाधिकारी यांचे लक्ष नव्हते काय.नगरपालिकेला शहरातील ही अवस्था दिसत असताना त्यांनी गर्दी हटविणेसाठी काय उपाय योजना केल्या.वरीष्ठ पोलीस अधिकारी जिल्हाधिकारी यांचेशही संपर्क साधणे गरज होते.तीन महीन्यात एक वेळ औषध फवारणी झाली त्यानंतर काय ? नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांची,नगराध्यक्ष नगरसेवकांची सतर्कता जास्ती जास्त दिसून येणे गरजेचे आहे.महामारीचे गांभीर्य पहाता त्यावर उपाय योजना करणे ऐवजी नागरीकांच्या सुरक्षितते साठी सामाजीक व राजकीय कार्यकर्त्यांनी एकत्र येणे ऐवजी स्वतःची पोळी भाजुन घेण्याचे, वर्चस्व वाढविणेचे, विरोधाला विरोध करण्याचे राजकारण चालु आहे.बदली बंद उपोषणाने हे प्रश्न सुटणार नाहीत.एखाद्या पोलीस अधिकाऱ्ययावर दोन्ही बाजूनी आरोप प्रत्यारोप होतात.दोन्ही बाजूमध्ये खरे खोटे असते. एक वेळ स्वेच्छा बदली प्रशासकीय मार्गाने झालेली असताना त्यावर गदारोळ कशासाठी,प्रसाशन थांबत नाही, एक जातो दुसरा येतो. विषय नागरीकाच्या आरोग्याचा व सुरक्षेचा आहे.यावर राजकारण नको.तालुक्यातील नागरीकांच्या सुरक्षेसाठी उपविभागीय दंडाधिकारी (प्रांत) तालुका दंडाधिकारी(तहसिलदार ) यांनी आपल्या अधिकाराचा वापर कठोरपणे करणे गरजेचे आहे.आमदारांनीही याकडे लक्ष द्यावे,तरच कायदा व सुव्यवस्था व सुरक्षा राबविली जाईल. नाहीतर हरीवर हवाला ठेऊनच रहावे लागेल,असे आरोपही अँड.अष्टेकर यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.