डफळापूर, वार्ताहर : डफळापूर ता.जत येथे प्रधानमंत्री घरकुल योजनेत खरे लाभार्थी सोडून यापुर्वी लाभ घेतलेले,श्रीमंताची नावे घुसडली असल्याने या योजनेचा सर्व्हे नव्याने करून गरजू,गरीब लाभार्थ्यांचा लाभ द्यावा,अशी मागणी कॉ.हणमंत कोळी यांनी केली आहे.
तसे निवेदन त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे.डफळापूर सह जत तालुक्यातील नव्याने मंजूर हुन आलेल्या प्रधानमंत्री घरकुल योजनेचे लाभार्थी निवडताना मोठा घोळ झाला असून यापुर्वी लाभ घेतलेले, धनिक व पक्की घरे असलेल्या ग्रामस्थांचा या यादीत समावेश आहे.खरी गरज असणारे गरीब, दीन दुबळ्या,गरजू वंचित,विधवा,आदी लाभार्थ्यांचा या योजनेपासून वंचित ठेवण्याचे कुट्टीर कारस्थान अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या संगनमताने करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.ज्या ग्रामस्थांनी या अगोदर घरकुल योजनेचा लाभ घेतलेला आहे,पक्की घरे बांधले आहेत,अशा ग्रामस्थांचा या यादीत समावेश आहे.कुटुंब प्रमुखाचे नाव यादीत गरजेचे असताना ज्याच्या नावावर जमीन जागा नाही, अशांचा या यादीत समावेश केला आहे.यामुळे दीन दुबळ्या,गरजू विधवांना या योजनेपासून अलिप्त ठेवण्यात आले आहे.
डफळापूर गावामध्ये या योजनेच्या संदर्भात ग्रामसेवका कडून अंदाजे 700 लाभार्थ्यांचा सर्व्हे करण्यात आला होता, परंतु ग्रामपंचायतीने यात हस्तक्षेप करत मनमानी कारभार करून तोंडेबघून केवळ 441 जणांची यादी मंजुरीसाठी प्रशासनाकडे पाठविण्यात आली आहे.उर्वरित लाभार्थ्यांची नावे ग्रामपंचायतीच्या दफ्तरात दाबून ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शासनाने चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेल्या प्रधानमंत्री घरकुल योजनेच्या सर्व्हे करून तातडीने रद्द करण्यात यावा व परत नव्याने सर्वे करा अन्यथा नाईलास्तव गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल यांची आपण प्रशासनाने नोंद घ्यावी,अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.निवेदनाच्या प्रती,मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. सांगली,गटविकास अधिकारी जत यांना देण्यात आले आहे.