जत,प्रतिनिधी : उमदी पोलीस ठाणे हद्दीत नाकाबंदी काळात पंधरा मोटार सायकलीवर मोटार व्हेईकल अँक्ट कायद्याअंतर्गत कारवाई करत 3 हजार रूपये दंड करत पाच जणावर
सीओटीपीए कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा यांनी बिनतारी संदेशद्वारे नाकाबंदी राबवून वाहन चेकींग तसेच सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणाऱ्या वर कारवाई करण्याबाबत सक्त सूचना दिल्या होत्या.त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी जत याचे मार्गदर्शन खाली दिनांक 27/6/2020 रोजी उमदी पोलीस ठाणे हद्दीतील चडचण फाटा उमदी येथे नाकाबंदी लावून ही कारवाई करण्यात आली.कोणीही धूम्रपान करून सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये की जेणे लागून कोरोना या रोगाचा प्रसार होणार नाही. घरी राहा सुरक्षित रहावे,असे आवाहन पोलीसाकडून करण्यात आले. सपोनि दत्तात्रस कोळेकर,पोलीस उपनिरीक्षक श्री. दांडगे, पोलीस नाईक श्री. खरात,पोलीस शिपाई रामगडे,पोलीस शिपाई चौगुले आदीनी सहभाग घेतला.