जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील बिळूर मध्ये पुन्हा 6 जणाचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती तालुका वैद्यकीय डॉ.संजय बंडगर यांनी दिली.
पहिला कोरोना बाधित मुत्यू झालेल्या रुग्णांच्या संपर्कामुळे बिळूरमधिल रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.बिळूरची बाधित व्यक्तीची एकूण संख्या 14 वर पोहचली आहे.आरोग्य विभागाकडून 72 जणांचे स्वाब घेण्यात आले होते.त्यापैंकी 35 जणाचे अहवाल जत आरोग्य विभागाला प्राप्त झाले आहेत.त्यापैंकी 6 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.