अंकलेतील 66 वर्षीय कोरोना बाधिताचा अखेर मुत्यू | जतमध्ये कोरोना बाधिताची संख्या एकूण 19 वर

0

जत,प्रतिनिधी : अंकले ता.जत येथील 66 वर्षीय कोरोना बाधित व्यक्तीचा आज (ता.27) उपचारा दरम्यान मुत्यू झाला.जत तालुक्यातील मुत्यू झालेला हा दुसरा तर जिल्ह्यातील बारावा व्यक्ती आहे. यापुर्वी तालुक्यातील आंवढी येथील एक व बिळूर मधील एक अशा दोघाचा मुत्यू झाला होता.

मृत व्यक्तीचे व अन्य एक असे दोन कुंटुबे कोरोना प्रभावित असलेल्या अंबरनाथ व मानखुर्द भागातून अंकलेत आले होते.

मयत व्यक्ती हा अंबरनाथ येथून 9 जूनला अंकलेत आला होता.तो व त्याचे कुंटुबिय अंकले – बाज हद्दीवर होम क्वॉरंटाईनमध्ये राहत होते.खबरदारी म्हणून आरोग्य विभागाकडून त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती.त्यात मयत 66 वर्षीय व्यक्तीसह अन्य एक असे दोघे कोरोना बाधित आढळून आले होते.तर अन्य संपर्कातील व्यक्तीचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले होते.एकटा कोरोनातून मुक्त झाला होता.

66 वर्षीय व्यक्तीवर गेल्या आठरा दिवसापासून नॉन इन्व्हेजीव व्हेंन्टिलेटरवर ठेवण्यात आले होते.अखेर शनिवारी त्यांचे निधन झाल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी घोषित केले.

Rate Card

दरम्यान अंकले येथील कोरोनाचा प्रभाव आटोक्यात आला आहे. त्यामुळे तेथे काही प्रमाणात प्रशासनाकडून शितीलता आणण्यात आली आहे.अंकलेनंतर बिळूर आता जत तालुक्यात हॉटस्पाट होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. बिळूरमध्ये आतापर्यत एकजणाचा मुत्यू झाला आहे. तर एकूण सात कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे.नेमकी बिळूरमधील पहिल्या बाधित व्यक्तीला कोरोनाची लागण कोठून झाली यांची अद्याप आरोग्य विभागाला लागली नसल्याने धोका वाढणार आहे.

बाजच्या कोरोना बाधित जावाईचा मुत्यू

अंकले येथील कोरोना बाधित मुळ सांगोला तालुक्यातील आहे.तर बाजचा जावाई आहे.त्यांची प्रकृत्ती चिंताजनक होती.त्यांचे शनिवारी मुत्यू झाला.त्यांच्या सह आंवढीतील एक,बिळूर मधील एक अशा तिघाचा मुत्यू झाला आहे.आतापर्यत जत तालुक्यात 19 पैंकी 8 जण कोरोनामुक्त होऊन परतले आहे.सध्या बिळूर 7,जत 1, निगडी 1,अंकले 1 अशा 7 जणांवर सध्या मिरज येथे उपचार सुरु आहेत.बिळूर मधील एकजणांची चिंताजनक आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.