दोन खाजगी डॉक्टरसह 48 जणांना संस्था क्वारंनटाईन
जत,प्रतिनिधी : बिळूर ता.जत येथील आणखीन तिघाजणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून बिळूरमधील एकूण संख्या चारवर पोहचली आहे. या कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कातील सुमारे 48 जणांना जत येथे संस्था क्वारंनटाईन केल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय बंडगर यांनी दिली.
बिळूर येथील इस्ञी व्यवसायिक एका 46 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची बाधा झाल्याचे त्याच्यावर उपचारा दरम्यान स्पष्ट झाले होते.त्यांच्या संपर्कात आल्याने अन्य तिघेजणांना त्रास होऊ लागल्याने त्यांचे स्वाब तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यातील तिघाचे पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्याने खळबळ उडाली आहे.सध्या बिळूरमधील 15 व जत येथील खाजगी दवाखान्यातील एका डॉक्टरासह दहा जणाचे स्वाब तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.
आरोग्य विभागाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. वरिष्ठ अधिकारी बिळूरमध्ये तळ ठोकून आहेत.