शरद पवारांवरील टीकेनंतर जतेत राष्ट्रवादी आक्रमक

0

आ.पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध

Rate Card

तहसिलदारांना दिले निवेदन

जत,(प्रतिनिधी):गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा मा. शरदचंद्रजी पवारसाहेब यांचेबद्दल केलेल्या वक्तव्यांचा जत तालुका राष्ट्रवादीच्यावतीने जाहीर निषेध करण्यात आला.याबाबतचे निवेदन तहसिलदार सचिन पाटील यांना देण्यात आले. 

गोपीचंद पडळकर यांनी काल दिनांक

24/06/2020 रोजी प्रसारमाध्यमाच्या मुलाखतीमध्ये बोलताना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या बद्दल चुकीचे अत्यंत खालच्या पातळीतील भाषेमध्ये वक्तव्य केले होते.गोपीचंद पडळकर यांनी सन 2019 विधानसभा निवडणुक बारामती मतदार संघातुन लढविली होती. त्या निवडणुकीत त्यांचा अत्यंत दारुण व अपमानास्पद पराभव झाल्याने त्या पराभवाचे शल्य त्यांना आजही टोचत आहे,त्यामुळे ते आजही विधानसभा निवडणुक 2019 मधील पराभूत मानसिकतेतुनच वावरत आहेत. तसेच ते भाजप पक्षाकडुन महाराष्ट्र विधानपरिषद सदस्य होऊन सुध्दा त्या पराभूत मानसिकतेतून बाहेर पडलेले नाहीत म्हणूनच त्यांनी असे खालच्या पातळीच्या भाषेतील वक्तव्य केलेले

आहे. गोपीचंद पडळकर हे ज्या पक्षातुन महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य झाले आहेत त्या भाजप पक्षाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सुध्दा शरद पवार यांच्या भारत देशाच्या व महाराष्ट्र राज्याच्या राजकीय, सामाजिक योगदान व विकासाबद्दल वेळोवेळी स्तुती व आदर व्यक्त केला आहे. तसेच त्यांच्याबद्दल बोलताना व टिका करताना त्या सर्वांनी कायम वैचारिक व आपल्या अभ्यासपुर्ण भाषेतुन बोलतात व टिका करतात. अशा सुसंस्कृत नेत्यांसोबत पक्षात काम करताना गोपीचंद पडळकर हे त्यांचे आचार व विचार यांना मुठ माती व तिलांजली देण्याचे काम करीत आहेत. गोपीचंद पडळकर यांनी सांगली लोकसभा मतदार संघातून लोकसभा निवडणुक सन 2019 मध्ये सुध्दा निवडणूक लढविताना व प्रचार करताना ते असेच अर्वाच्च व खालच्या भाषेतील वक्तव्य करुन प्रसिध्दी मिळवण्याचा केविलवाना प्रयोग यापुर्वीही केला आहे. त्याचमुळे सांगली जिल्ह्यामधील पुरोगामी व शातंताप्रिय जनतेने त्यांना अस्मान दाखविले आहे.आ.पडळकर स्वत:च्या पातळीपेक्षा मोठ्या नेत्यांवर अर्वाच्च भाषेत व खालच्या पातळीच्या भाषेत टिका करणे, बोलणे हा त्यांचा पुर्वीपासुनचा कलंकित इतिहास आहे. हे त्यांचा अवगुण संपुर्ण महाराष्ट्रातील जनतेला ज्ञात व माहीत आहे. गोपीचंद पडळकर हे आजपर्यंतच्या सर्वच निवडणुकीतल्या पराभवाने ते पराभुत मानसिकतेतुन ते असे बेताल वक्तव्य करत असतात. जो व्यक्ती मते मिळविण्यासाठी समस्त धनगर समाजाचे व इतर महाराष्ट्रातील समाजबांधवाचे आराध्य दैवत असणाऱ्या श्री क्षेत्र बिरोबा आरेवाडी या देवाची खोटी शपथ घेऊन धनगर समाज समवेत बहुजन समाज़ाला,

फसविण्याचे व दिशाभुल करण्याचे काम त्यांनी केले आहे. अशा व्यक्तीची स्वतःची कोणतीच राजकीय, सामाजिक कतृत्व व योगदान नसताना असे चुकीचे व बेताल वक्तव्य करणे हे अशोभनिय व निषेधनिय आहे. म्हणुनच आज जत तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसकडुन गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा जाहीर व तिव्र निषेध व्यक्त करीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर जत तालुका राष्ट्रवादी युवक कॉग्रेस अध्यक्ष उत्तमराव चव्हाण, अशोक कोळी, सतीश कोळी, हेमंत खाडे, रमजान नदाफ, सागर चंदनशिवे, राहुल बामणे, अमर मानेपाटील, मयूर माने आदींच्या सह्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.