ग्रामीण आठवडे बाजार सोशल डिस्टन्सिंग पाळत अखेर सुरू

0
2

डफळापूर, वार्ताहर : कोरोना लॉकडाऊनमुळे बंद असलेले जत तालुक्यातील गावागावातील आठवडे बाजार अखेर हळूहळू सोशल डिस्टन्सिंग पाळत सुरू झाले आहेत.

तालुक्यातील सुमारे 70 गावात असे छोटेमोठे आठवडे बाजार भरविले जातात.त्यात शेळ्या,मेढ्या,मोठी जनावरे,भाजीपाला,अन्नधान्य,जीवनावश्यक वस्तू खरेदी केल्या जातात.अनेक शेतमजूर,शेतकरी,नागरिकांची या आठवडा बाजार दिवशी अर्थकारण अवलंबून असते.अगदी मजूराचे पगारही याच आठवड्याच्या दिवशी होत असतात.शेतातील उत्पादित माल विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना आठवडे बाजार बाजारपेठ असते.कोरोनाचा प्रभाव वाढताच दोन महिन्यापुर्वी हे गावागावातील आठवडे बाजार बंद करण्यात आले होते.त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला होता.शेतीसह,नागरिकांचे छोटे,मोठे व्यवहार थांबले होते.शेतकऱ्यांचा माल घरात पडून राहिला होता.अखेर पंतप्रधानानी अँनलॉक मध्ये काहीअंशी सुट दिल्याने गावागावतील हे आठवडे बाजार सोशल डिस्टन्सिंग पाळत काही प्रमाणात सुरू झाले आहेत.यानिमित्ताने ग्रामीण अर्थव्यवस्था रुळावर येण्यास मदत होणार आहे.

जत तालुक्यातील ग्रामीण आठवडे बाजार सोशल डिस्टन्सिंग पाळत सुरू झाले आहेत.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here