जत,प्रतिनिधी : शेगाव ता.जत येथील महादेव विठोबा गायकवाड (वय-80, मोकाशवाडी) यांचा मृत्तदेह आढळून आला.याबाबत जत पोलीसात नोंद झाला आहे.
पोलीसाकडून मिळालेली माहिती अशी,
शेगाव ओढा पात्रात एक पुरूष जातीचा मयत स्थितीत मृतदेह आढळला होता.जत पोलीसांनी घटनास्थळी जाऊन मृत्तदेहाची ओळख पटवत शव विच्छेदन करून मृत्तदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.दरम्यान महादेव गायकवाड यांना एक विवाहित मुलगी आहे.ती इचलकरंजी येथे राहते.महादेव एकटेच मोकाशवाडी येथे राहत होते.मुत्यूबाबत नेमके कारण समजू शकले नाही.अधिक तपास जत पोलीस करत आहेत.