दुय्यम निबंधक कार्यालयामुळे मोरे कॉलनी परिसराला महत्व
जत,प्रतिनिधी : जत तहसिल कार्यालय परिसरातील दुय्यम निबंधक श्रेणी-1 ,जत हे कार्यालय मोरे काॅलनी (संभाजी नगर) जत,या ठिकाणी स्थलांतरीत झाल्याने मोरे काॅलनी संभाजी नगरचे रूपडे पालटू लागले आहे.
जत तहसीलदार कार्यालय आवारातील संस्थान कालीन इमारतीमध्ये असलेले दुय्यम निबंधक कार्यालय हे अपुरे जागेत असल्याने व ते गैरसोईचे होत असल्याने जतचे दुय्यम निबंधक सुनिल पाथरवट यानी सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी सांगली एस.एस.दुतोंडे यांच्याशी चर्चा व विचार विनिमय करून जतचे हे दुय्यम निबंधक कार्यालय हे मोरे काॅलनी संभाजी नगर जत येथिल कोडग काॅम्प्लेक्स या ठिकाणी स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेतला.
मोरे काॅलनी संभाजी नगर जत येथिल कोडग काॅम्प्लेक्स या ठिकाणी दुय्यम निबंधक कार्यालय स्थलांतरीत झाल्यानंतर या कार्यालया समोर असलेल्या रस्त्याच्या लगत असलेल्या जत नगरपरिषदेचे खुल्या जागेवर कोणी अतिक्रमण करू नये यासाठी जत नगरपरिषदेने त्यांच्या खुल्या जागेच्या भोवताली जे.सी.बी.ने चर काढून ही जागा बंदिस्त केली आहे.चहा,नाष्ठा झेराक्स सेंटर,फोटो शॉपची दुकाने सुरू झाल्याने गर्दी वाढू लागली आहे.
दुय्यम निबंधक कार्यालयात जत तालुक्यातील जत पश्चिम,जत दक्षिण,जत उत्तर व पूर्व भागातील संख, उमदी या लांब अंतराच्या गावातून पक्षकार मोठ्या संख्येने जमिन व घरजागेचे प्राॅपर्टी नोंदणी चे कामासाठी येत असल्याने मोरे काॅलनी संभाजी नगर ला दुय्यम निबंधक कार्यालयामुळे एक वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे.
जत तहसिल कार्यालय परिसरातील दुय्यम निबंधक श्रेणी-1 जत हे कार्यालय स्थलांतरीत झाल्याने जत तहसिलदार कार्यालय आवारातील पन्नास टक्के लोकांची गर्दी व या परिसरात असलेले हाॅटेल व्यवसाईक हेही मोरे काॅलनी संभाजी नगर येथे काळाची पाऊले ओळखून आपले बस्तान बांधू लागल्याने या वसाहतीला वेगळे महत्त्व आले आहे.कार्यालय सुरू झाल्यामुळे कार्यालयासमोरील रस्त्यावर दोन चाकी व चारचाकी वाहने रस्त्याचे दोन्ही बाजूला उभी केलेली, कार्यालयात व मुद्रांक विक्रेते व दस्तलेखनिक यांच्या कार्यालयात होत असलेली पक्षकारांची गर्दी, चहा व नाष्टा विक्रेते यांच्या हातगाडी सभोवताली झालेली गर्दी ही दिसून येते.एकंदरीत एक महत्वपूर्ण कार्यालय स्थलांतरीत झाल्यानंतर ते ज्या ठिकाणी स्थलांतरीत झाले आहे. त्या कार्यालयाचे सभोवताली असलेल्या जागेला किती महत्व प्राप्त होते हे यावरून दिसून येते.
मोरे कॉलनी परिसरात सुरू
झालेल्या दुय्यम निंबधक कार्यालयामुळे गर्दी वाढू लागली आहे.
Attachments area