संख,वार्ताहर : संख ग्रामपंचायतीच्या भष्ट्राचार तक्रारीवरुन मंगळवारी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुड्डेवार यांनी तपासणी केली.ग्रामपंचायतीकडून खर्च केलेल्या 5 हजारावरील सर्व रक्कमेचे व्हाऊचर यावेळी तपासण्यात आले.
यावेळी बिडिओ अरविंद धरणगुत्तीकर, विभागीय उपअभिंयता उबाळ,शेख,पाणी पुरवठ्याचे देशपांडे,संरपच मंगल पाटील,ग्रामविकास अधिकारी के.डी.नरळे व पदाधिकारी उपस्थित होते.
संख ग्रामपंचायतीत आर्थिक गैरव्यवहार झाल्याची तक्रार स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेकडे करण्यात आली आहे. त्यांची तपासणी करण्यासाठी गुड्डेवार यांनी मंगळवारी संख ग्रामपंचायतीत तळ ठोकला होता.गेल्या साडेतीन वर्षातील संशयास्पद वाटणाऱ्या सर्व व्यवहाराची तपासणी करण्यात आली आहे. काही संशय,त्रुटी असणाऱ्या विकासाकामाची तपासणी होणार आहे,त्यात गैर कारभार आढळून आल्यास कडक कारवाई करू,असा इशाराही गुड्डेवार यांनी दिला.
संख ग्रामपंचायतीच्या गैरकारभारांची तपासणी करताना अतिरिक्त कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुड्डेवार