जत,प्रतिनिधी : जतचे कामगार सेना राज्य उपाध्यक्ष दिनकर पंतगे यांना कोरोना काळात केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र यांचा कोविड योध्दा तर जनता कल्याण पार्टी यांचा कोरोना सेवा योध्दा राज्यस्तरीय सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.
पंतगे यांनी कोरोनाच्या गेल्या दोन महिन्यात कोरोना महामारीच्या लॉकडाऊनच्या कठीण काळात जत तालुक्यातील गावागावात नागरिकांना मदत म्हणून मास्क,जीवनावश्यक वस्तू,औषधे सँनिटायझर, डेटॉल,अन्नधान्य मोफत वाटप केले आहे.कोरोना संकट काळात कोविड -19 च्या विरोधात योध्दाप्रमाणे काम करत आहेत.त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना कोरोना योध्दा म्हणून गौरव करण्यात आला आहे.