उमदी,वार्ताहर : महाराष्ट्र शासन व समरजीत कृषी सेवा केंद्र यांचे सयुंक्त विद्यमानाने शेतकऱ्यांच्या बांधावर रासायनिक खते व बियाणे पुरवठा कार्यक्रमांची सुरूवात आमदार विक्रमसिंह सांवत यांच्याहस्ते संपन्न झाला.
उमदी विठ्ठलवाडी येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा पौष्टिक तृणधान्य अभियान अंतर्गत बाजरी प्रकल्पाची पाहणीही यावेळी करण्यात आली.यावेळी माजी पं.स.सभापती बाबासाहेब कोडग,माजी मार्केट कमिटी सभापती संतोष पाटील,उपविभागीय अधिकारी कांताप्पा खोत,कृषी अधिकारी मेडेदार,माजी उपसरपंच दिलीप सोलापुरे सावकार,उपसरपंच रमेश हळके,निवृत्ती शिंदे,वहाब मुल्ला,सुरेश रोहिदास सातपुते,कोहळळी,बंडू शेवाळे,व पदाधिकारी उपस्थित होते.
उमदी ता.जत येथे बांधावर रासायनिक खते व बियाण्याचा पुरवठा करण्यात आला.