आंवढी गाव कोरोना मुक्त
आंवढी,वार्ताहर : आंवढी ता.जत हे गाव अखेर कोरोना मुक्त झाले.कोरोना बाधित तिघे रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत.गेल्या महिन्यात मुंबईहून आलेल्या चौघांना कोरोनाची लागण झाली होती.त्यांच्यावर मिरज कोविड रुग्णालयात उपचार सुरू होते.उपचारा दरम्यान एका 55 वर्षाचा व्यक्तीचा मुत्यू झाला होता.तर अन्य तिघावर उपचार सुरू होते.त्यांनी
14 दिवस कोविड रुग्णालयात तर पुढील 10 दिवस संस्था क्वारंनटाईन कार्यकाळ पुर्ण केल्याने त्यांना मंगळवारी दोघांना व गुरूवारी एकाला घरी सोडण्यात आले.
आंवढीकरांनी या तिघा कोरोना मुक्त युवकांचे फुलाचा वर्षाव करत स्वागत केले.तिघेही घरी परताच आंवढीकरांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.रुग्ण सापडताच तालुका प्रशासन, ग्रामपंचायत स्तरावर खबरदारी घेण्यात आली होती.बाधित तरूणांच्या संपर्कातील नातेवाईकांना जत येथे संस्था क्वारंनटाईन करत,त्यांचे स्वाब तपासण्यात आले होते.त्यात चारजण वगळता सर्वाचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने दिलासा मिळाला होता.त्याशिवाय संसर्ग रोकण्यातही प्रशासनाला यश आले होते.चौदा दिवस गाव लॉकडाऊन करण्यात आले होते.औषध फवारणी करण्यात आली होती.

आंवढी ता.जत येथे कोरोना मुक्त झालेल्या तिसऱ्या युवकांचे स्वागत