जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील निगडीखुर्द येथे कोरोनाचा रूग्ण आढळून आल्याने निगडीखुर्द परिसरासह जत तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
निगडीखुर्द येथिल एक 35 वर्षीय युवक दिल्ली येथे गलाई व्यवसाय करतो. तो व त्याचे कुटुंबिय यात त्याची पत्नी व तीन मुले नुकतेच दिल्लीहुन रेल्वेने मिरज येथे आले होते. त्यानंतर मिरजेतून ते चारचाकी वाहनातून कुटुंबियासह आपल्या गावी निगडीखुर्द येथे वायफळ रस्त्यावर टेकडे सावंत वस्तीवरील त्यांच्या घरी आले होते.
या तरूणाला मधुमेह व रक्तदाब असल्याने व गावी आल्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू आगल्याने प्रशासनाने त्याला मिरज येथिल कोविड रूग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले होते.
या तरूणाची कोविड तपासणी केली असता तो पाॅझीटीव्ह असल्याचे दिसून आले. त्या मुळे प्रशासनाने त्याच्या बरोबर दिल्लीहुन आलेल्या त्यांच्या पत्नी व मुलाला तसेच त्याचा भाऊ व आई वडिल यांच्यासह दहा व्यक्तींना काॅरंटाईन करण्यात आले आहे.
आज कोरोना रूग्ण ज्या ठिकाणी रहात होता त्या ठिकाणाला जतचे गटविकास अधिकारी श्री .अरविंद धरणगुत्तीकर, पोलीस निरीक्षक श्री. रामदास शेळके, तालुका वैद्यकिय अधिकारी श्री.संजय बंडगर यानी भेट देउन रूग्ण रहात असलेल्या परिसराची पहाणी केली.
निगडीखुर्द येथे कोरोनाचा रूग्ण आढळून आल्याने निगडीखुर्द परिसरासह वायफळ, बनाळी,काराजनगी सह परिसरात खळबळ उडाली आहे.