जत तालुक्यात ठेकेदाराकडून भर पावसात रस्त्याची कामे

0

Rate Card

जत,प्रतिनिधी :  शासनाचे नियम डावलून ठेकेदार भर पावसात रस्त्याची डांबरीकरणाची कामे करत आहेत.मात्र लोकप्रतिनिधी गप्प आहेत हे विशेष.
20 मे पर्यत डांबरीकरणाची कामे पुर्ण करायची असताना मात्र सध्या भर पावसात जुन महिन्यांत ठेकेदाराकडून घाईघाईत रस्त्यांची डांबरीकरणाची कामे जोरात सुरू झाली आहे.तर पावसाळ्यात रस्त्यावर डांबरीकरण होत असल्याने हे डांबर टिकणार का?असा सवाल ग्रामस्थांमधून उपस्थित होत आहे.सध्या पावसाळ्याचा सिजन आला असताना गटार बांधणी व डांबरीकरण करण्यास ठेकेदाराला परवानगी कशी काय देण्यात आली आहे,असाही सवाल उपस्थित होत आहे.पावसाळ्यात सुरू केलेली ही कामे निकृष्ट दर्जाचे डांबरीकरण व बांधकाम सदर ठेकेदारा कडून केले जात आहे.दोन तिन दिवसा डफळापूर येथे डफळापूर-अंनतपूर या रस्त्यावर ठेकेदार भर पावसात डांबरीकरण करत असताना ते काम ग्रा.प.सदस्य देवदास पाटील, सागर चव्हाण यांनी तात्काळ थांबवले आहे.असाच पवित्रा इतर ठिकाणी लोकप्रतिनिधी घेतला तर भर पावसात सुरू असलेली रस्त्याची डांबरीकरणाची कामे थांबू शकतात.

जत तालुक्यात अशा पध्दतीने पाऊस पडल्यानंतरही डांबरीकरणाचे काम सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.