जत,प्रतिनिधी : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जत कृषी विभागाकडून हंगामातील योजनाची मोहिम सुरू करण्यात आली आहे. त्यात हुमणीकिड नियंत्रण,शेतकऱ्यांना गटाची निर्मिती,शेतीशाळा उपक्रम राबविणे,अमेरिकन लष्करी अळी नियंत्रण योजनाची गावोगावी मोहिम राबविण्यात आली आहे.
या अंतर्गत मौजे खलाटी ता.जत येथे शेतीशाळा उपक्रम,मका प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.बिळूर,बसर्गी येथे हुमणी किड नियंत्रण मोहिम साबविण्यात आली.
कार्यक्रमास मंडळ अधिकारी बी.बी.बामणे,पर्यवेक्षक एस.के.थोरात,कषी सहायक ए.ए.भोसले,एल वाय पवार,डी.टी सांळुखे उपस्थित होते.कृषी सहायक धनाजी सुतार यांनी नियोजन केले.
आयोजित खरीप हंगामातील कृषी योजनाची माहिती देण्यात आली.